फोटो सौजन्य - Social Media
CBSE भरतीसाठी निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षा अधीक्षक पदासाठी घेण्यात आल्या होत्या. तर कनिष्ठ सहाय्यक पदासाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले होते. मुळात, या परीक्षेचे आयोजन ऑफलाईन स्वरूपात करण्यात आली होती. २० एप्रिल २०२५ रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या भरतीच्या माध्यमातून २१२ रिक्त जागांसाठी भारत९ईचे आयॊजन करण्यात आले होते. या भरतीमध्ये मोठ्या संख्येने उमेदवारांनी अर्ज केले होते. यातील १४२ पदे अधीक्षक पदासाठी आहेत तर ७० पदे कनिष्ठ सहाय्यक पदासाठी आहेत.
या भरतीसंदर्भात जाहीर करण्यात आलेल्या पगारश्रेणीनुसार, कनिष्ठ सहाय्यक पदासाठी 19,900 रुपये ते 63,200 रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे. अधीक्षक पदासाठी 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
पुढे उमेदवारांना काही टप्प्यांना पात्र करावे लागणार आहेत. यामध्ये उमेदवारांना टायपिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असणे आवश्यक. हा टेस्ट संगणकावर होईल. अधीक्षक पदासाठी टियर-2 म्हणजेच वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Paper) होणार आहे, ज्यामध्ये निबंध, पत्रलेखन आणि प्रशासकीय कौशल्ये तपासली जातील. यानंतर स्किल टेस्ट किंवा मुलाखत होऊ शकते. उमेदवारांना दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
अंतिम टप्प्यात पात्र उमेदवारांची मूळ शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), अनुभव प्रमाणपत्र (लागल्यास) यांची पडताळणी केली जाईल. सर्व टप्प्यांनंतर अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) तयार केली जाईल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.