फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेमार्फत एकूण २९६४ पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार 29 मे 2025 पर्यंत एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर sbi.co.in जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduate) पूर्ण केलेली असावी. तसेच केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता असलेले उमेदवारही पात्र आहेत. यामध्ये मेडिकल, इंजिनीअरिंग, चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट अशा व्यावसायिक पदव्या असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात.
उमेदवारांना या भरतीसाठी काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. वयाची गणना 30 एप्रिल 2025 रोजीच्या आधारे केली जाईल. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे. तसेच SC, ST आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे.
उमेदवारांना अशा प्रकारे करता येईल अर्ज:
या भरतीद्वारे देशभरातील हजारो उमेदवारांना प्रतिष्ठित बँकेत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता त्वरित अर्ज करावा. अधिक माहिती आणि अपडेटसाठी SBI च्या अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट देत राहा.