फोटो सौजन्य- iStock
राज्यातील मत्सव्यवसायाचा विकास आणि विस्तार व्हावा याकरिता मत्सव्यवसायाच्या विविध घटकांबद्दल सहा महिन्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 133 व्या सत्राकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025 या कालावधीमध्ये असणार आहे. याकरिता इच्छुकांनी 24 डिसेंबर पर्यंत अर्ज करायचे आहे. जाणून घेऊया या प्रशिक्षणाबद्दल सविस्तर
प्रशिक्षणात हे शिकवले जाणार
या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय, नौकानयनाची मूलतत्वे, सागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षणाचा कालावधी- 6 महिने ( 1 जानेवारी 2025 ते 30 जून 2025)
प्रशिक्षणाचे ठिकाण- मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर
प्रशिक्षणाचे शुल्क
या प्रशिक्षणासाठी दारिद्र्यरेषेवरील प्रशिक्षणार्थीकडून प्रतिमहिना रूपये 450/-, दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थीकडून रूपये 100/- शुल्क आकारले जाते.
पात्र प्रशिक्षणार्थी निकष
अर्ज करण्याची अंतिम तारीख- प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेले उमेदवार हे 24 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करु शकतात.
अर्ज करण्याचा पत्ता
या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशींसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडुरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मुंबई-61 येथे 24 डिसेंबर 2024 पर्यंत सादर करावेत.
प्रशिक्षणासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
या प्रशिक्षण सत्राच्या अधिक माहितीसाठी सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, वर्सोवा, मो. 9920291237 आणि जयहिंद सूर्यवंशी, यांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांच्यांशी संपर्क साधावा.
सन 2024-25 या चालू वर्षातील दिनांक 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 या सहा महिन्याच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या 132 व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा, मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्वरीत वर नमूद केलेले प्रशिक्षण सुरु होत आहे.