फोटो सौजन्य - Social Media
डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एजुकेशन अँड रिसर्च (DMER)ने भरतीला सुरुवात केले आहे. उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून १,१०० पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना जूनच्या १९ तारखेपासून अर्ज करता येणार आहे. तर उमेदवारांना जुलैच्या ९ तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कमेची भरपाई करावी लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी ही रक्कम १००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. तर आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी ही रक्कम ९०० रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना काही निकष पात्र करावे लागणार आहेत.
हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ४३ वर्षे आयु या भरतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वय ३८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
अनुभव तसेच पदांनुसार उमेदवारांना दरमाह वेतन १९,९०० ते १,४२,००० इतके निश्चित करण्यात आले आहे. या भरतीमध्ये दहावीपासून अगदी पोस्ट Graduation असणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज निश्चित करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेत कॉम्प्युटर बेस्ड टेस्टचा समावेश आहे. तसेच अनुभव कौशल्याची चाचणी घेण्यात येईल. दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी उमेदवारांना यावे लागणार असून पात्र उमेदवारांना नियुक्तीसाठी योग्य घोषित केले जाईल. अधिक माहितीसाठी DMER ने जाहीर केलेले अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.