फोटो सौजन्य - Social Media
CBSE ने पुढील शैक्षणिक शैक्षणिक वर्षासाठी नवीन नियम जाहीर केला आहे. मुळात, ही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाची बातमी आहे. CBSE दहावीची बोर्डाची परीक्षा आता दोन सत्रात घेतली जाणार आहे. आता CBSE दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे. या संबंधित अधिक माहिती CBSE जाहीर करणार असून काही प्रमाणात माहिती सादर करण्यात आली आहे. मुळात, परीक्षा दोनदा घेणार असून पहिले स्तर फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणार आहे. तर दुसरे सत्र मे महिन्यात घेणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६ पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे, विद्यार्थयांनी याची नोंद घेण्यात यावी. फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा निकाल एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात येईल. तर मे महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षेचा निकाल जून महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. सगळ्यात महत्वाची बातमी अशी आहे की पहिल्या टप्प्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे, तर दुसऱ्या सत्रासाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती वैकल्पिक आहे.
बोर्डाने एका महत्वाच्या गोष्टीवर स्पष्टता दिली आहे की इंटर्नल असेसमेंट एकदाच दिले जाईल. जरी विद्यार्थ्यांनी दोनदा परीक्षा दिल्या असाव्या, यामध्ये काहीच बदल केले जाणार नाही आहे.