फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने डिसेंबरच्या 2 तारखेला MBBS परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षे संदर्भात सवाल उपस्थीत करण्यात आला आहे. परीक्षेचा प्रश्नसंच परीक्षा होण्याअगोदर फुटला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पेपर लीक झाल्यामुळे तो पेपर तेथेच स्थगित करण्यात आला आहे. तर ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ती परीक्षा डिसेंबरच्या 19 तारखेला घेण्यात येणार आहे. वैद्यकीय शैक्षणिक विभागात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे परीक्षेची तिथी बदलण्याची वेळ शैक्षणिक विभागावर आली आहे. MBBS च्या द्वितीय वर्षाचा पेपर फुटला आहे. परीक्षा सुरु होण्याचा तासाभरागोदर फार्मकोलॉजी -१ या विषयाचा पेपर फुटला गेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राज्यभरातून अनेक विद्यार्थी या परीक्षेसाठी उपस्थित असतात. यंदाच्या वेळी राज्यभरात ५० परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण ७,९०० विद्यार्थी उपस्थित राहिले होते. परंतु या खळबळजनक प्रकारामुळे फेरपरीक्षा १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या पेपर फुटीमागे असणारे कारण शोधण्यासाठी शैक्षणिक विभाग प्रयत्नशील आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठाने उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली आहे. कारण शोधण्यास ही समिती कार्यशील आहे. मुळात, या घटनेमुळे परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. परीक्षेच्या दिवशी MBBS चा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने समितीने यावर हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच भविष्यात अशा गोष्टी घडू काम नयेत म्हणून कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे मिळाली पेपर लीक होण्याची माहिती
२ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने MBBS च्या दुसऱ्या वर्षीय फार्माकोलॉजी-१ या विषयाची परिसक्ष आयोजित केली होती. परीक्षा सुरु होण्याच्या काही कार्यकाळाच्या अगोदरच या विषयांच्या संदर्भात असलेले MCQ स्वरूपातील प्रश्न सोशसल मीडियावर व्हायरल झाले. विद्यापीठाला ईमेलद्वारे ही माहिती कळवण्यात आली. या स्रोतापासून माहिती मिळताच विद्यापीठाने परीक्षा रद्द केली. या सर्व प्रकरणाविषयी जाणून घेण्यासाठी आणि सखोल संशोधनासाठी सायबर सेल आणि ठराविक समितीची निवड करण्यात आली आहे.
पेपर लीक होण्याचे कारण काय?
पेपर फुटण्यामागचे कारण अद्याप समोर आले नाही आहे. यावर शोध करण्यासाठी विद्यापीठाने उच्चस्तरीय तपास समिती स्थापन केली आहे. तसेच प्राप्त झालेल्या ईमेलच्या शोधासाठी विद्यापीठाने सायबर सेलची निवड केली आहे. तसेच म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिले आहेत.