फोटो सौजन्य - Social Media
सर्वोच्च न्यायालयामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आले आहे. अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. कोर्ट मास्टरच्या ३१ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. तसेच इतर काही रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत. 33 वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदे आणि 43 वैयक्तिक सहाय्यक पदांचा यामध्ये समावेश आहे. एकूण १०७ जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजली गेली आहे. मुळात, सर्वोच्च न्यायालय असल्याने नियुक्त उमेदवाराला कामासाठी दिल्ली स्थलांतर करावे लागणार आहे. पुरुष असो वा स्त्री दोघांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी या तारखेला लक्षात ठेवावे, तसेच दिलेल्या मुदतीच्या आतमध्ये अर्ज करण्यात यावे.
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी sci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. आज अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. डिसेंबर २०२४ च्या ४ तारखेपासून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. दुपारी ४ वाजल्यापासून भरतीला सुरुवात करण्यात येणार आहे. तर २५ डिसेंबरच्या रात्री ११:५५ पर्यंत अर्ज करण्याची विंडो खुली असणार आहे. या भरती संदर्भात परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांना या परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे. तसेच अर्ज करताना उमेदवारांना काही रक्कमेची भरपाई करायची आहे. एकंदरीत, अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून १००० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. OBC तसेच EWS आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारखी रक्कम अर्ज शुल्क भरायची आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातींमधून येणाऱ्या उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे, तर PWD आणि ESM या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क म्हणून २५० रुपयांची भरपाई करायची आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. SCI भर्ती 2024 साठी निवड प्रक्रिया ही कौशल्य चाचणी (टायपिंग, स्टेनो), लेखी परीक्षा, मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा टप्प्यांमध्ये पार पडते. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही शैक्षणिक आणि वयोमर्यादे विषयक अटी पात्र करावे लागणार आहेत. या भरती संदर्भात सखोल माहितीसाठी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.