Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते ‘वाद्यमंथन’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन! ‘महाराष्ट्रातील संगीत वाद्ये’ विषयावर प्रकाश

‘वाद्यमंथन’ या ई-पुस्तकातून महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांचा समृद्ध वारसा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामुळे लोकसंगीत आणि संस्कृतीची नवी ओळख पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 18, 2025 | 10:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

‘महाराष्ट्रातील संगीत वाद्ये’ या विषयावर आधारित ‘वाद्यमंथन’ या ई-पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक, लोकसंगीताशी निगडित तसेच शास्त्रीय परंपरेतील एकूण ११० वाद्यांची सचित्र माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.

चिकाटी, मेहनत आणि निष्ठा असल्यास कोणतीही अडचण पार करता येते! IPS अधिकारी अनुकृति तोमर

या प्रकाशन सोहळ्याचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ७५ वाद्यांचे प्रदर्शन आणि सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होताना मंत्री शेलार म्हणाले, “‘वाद्यमंथन’ या पुस्तकामुळे महाराष्ट्रातील विविध वाद्यांना नवी ओळख मिळेल आणि पारंपरिक कलांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचेल.”

या ई-पुस्तकात प्रत्येक वाद्याची ओळख, त्याचा उपयोग, रचना, सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि कोणत्या प्रसंगी वाजवले जाते याची माहिती सविस्तर दिली आहे. त्या लोकवाद्यांमध्ये टिमकी, टिंगरी, डेरा, हिरोबाई किंगरी, डकलवार किंगरी, बिगुल, भेर, किल्लेतोंडा, तारपा, पागई, घाटोळी, घांगळी, चोंगा, मंदल, मंदारी, पिरी, ढाक, डहाका, सुरसोटा, गादली, शिंग पेपा, तुरंबा, धुम्मस, डवर, पावरी, दिमडी, गुडगुडी, घुमट, करताल, टप्पा, चिटकुरी, घाटी, खैताळ, रेला, टिंगरी, तिबुली, डोना, घोळकाठी, तटकली, मादळ, गुबूगुबू ढोल, खालुबाजा, कहाळे, तुंबडी अशा वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा समावेश आहे. संबळ, सनई, चौघडा, सुंदरी, वेगवेगळ्या प्रकारचे ढोल, भोंगा, पिपाणी, पायपेटी, पखावज, हलगी ताशा, चोंडके, ढिंगी, सारंगी, तुणतुने, तुर अशाही वाद्यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल होते, तर सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंह, पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

BSF कॉन्स्टेबल GD भरती 2025 : स्पोर्ट्स कोट्यातून मोठी संधी! इच्छुकांनी करा अर्ज

शेलार यांनी यावेळी सांगितले की, “महाराष्ट्राची कला आणि संस्कृती अत्यंत समृद्ध आहे. यातील अनेक दुर्लभ घटकांचे दस्तऐवजीकरण आवश्यक आहे. ‘वाद्यमंथन’ हे त्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.” विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासकांसाठी आणि रसिकांसाठी हे ई-पुस्तक मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Minister ashish shelar releases the e book vadyamanthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 10:03 PM

Topics:  

  • Ashish Shelar

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर
1

महाराष्ट्राच्या रिअल इस्टेटमध्ये नव्या युगाची सुरुवात! मुंबई लवकरच भारताची ‘वॉटरफ्रंट राजधानी’ बनण्याच्या मार्गावर

“ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष! ‘अभंग तुकाराम चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित
2

“ज्ञानोबा माऊली तुकाराम” चा जयघोष! ‘अभंग तुकाराम चित्रपटाचा संगीत सोहळा संपन्न; सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.