
इंटरनॅशनल कपमध्ये अॅलन वॉकरचा जलवा; पहिल्याच दिवशी कोरियन संघांचा दबदबा
अॅलन वॉकर याने BGMI समुदायासाठी विशेष सादरीकरण करुण २०२४ मधील ‘Be A Hero’ मोहिमेद्वारे लोकप्रिय झालेल्या त्याच्या ‘Hero’ या अँथमने लाखो BGMI खेळाडूंशी नाते जोडले होते. या गाण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याने BGMI चाहत्यांना प्रत्यक्ष लाइव्ह परफॉर्मन्सचा अनुभव दिला आहे.या कार्यक्रमाला मुंबईतील कोरिया प्रजासत्ताकाचे महावाणिज्यदूत Yoo Dongwan हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी आशीष शेलार यांनी ईस्पोर्ट्स हे केवळ गेमिंगपुरते मर्यादित नसून, तरुणांसाठी कौशल्य, शिस्त आणि करिअरच्या नव्या संधी उपलब्ध करून देणारे महत्त्वाचे क्षेत्र बनत असल्याचे सांगितले. भारतात ईस्पोर्ट्सला क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात मिळणारी मान्यता ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. BMIC सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमुळे भारतीय खेळाडूंना जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मैदानावर कोरियन संघांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. Korea Esports League 2026 ची विजेती Nongshim RedForce ७२ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिली. Dplus KIA ने ७१ गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. विशेष म्हणजे दोन्ही संघांमध्ये केवळ एका गुणाचा फरक होता. Dplus KIA ने दिवसातील दोन्ही Winner Winner Chicken Dinners (WWCD) जिंकले. गतविजेत्या Kiwoom DRX ने ५६ गुणांसह तिसरे स्थान मिळवले आहे.
भारतीय संघांनीही चांगली कामगिरी केली. Outrage Esports ने एक Chicken Dinner जिंकत ४७ गुणांसह चौथे स्थान मिळवले. त्यामुळे पहिल्या दिवसानंतर हा सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय संघ ठरला. K9 Esports नेही एक सामना जिंकून आपली ताकद दाखवली. Blitz Epigrotive Gaming सहाव्या, तर iQOO 8Bit नवव्या स्थानावर राहिली. BMSD २०२६ ची विजेती iQOO SouL मात्र १३व्या स्थानावर आहे.
पहिल्या दिवशी प्रत्येक संघाने सहा सामने खेळले. स्पर्धेतील उर्वरित सामने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार असून, दोन्ही दिवशी प्रत्येकी सहा सामने होतील. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण KRAFTON India Esports च्या YouTube चॅनेलवर करण्यात येणार आहे.