Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठ प्रथम! विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

लोकभवनाच्या माध्यमातून आयोजित माजी कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 28, 2025 | 03:07 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

लोकभवनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या माजी कुलपती डॉ. पी. सी. अलेक्झांडर राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात एम.ए. (डेव्हलपमेंट स्टडीज) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या अभय आळशी या विद्यार्थ्याने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला.

सापांच्या अधिवासात थोडासा बदल आणि पुढे….मुंबईतील हाफकिन संस्थेचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यास

ही राज्यस्तरीय स्पर्धा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे शनिवारी पार पडली. राज्यातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. उत्स्फूर्त मराठी वक्तृत्व या स्वरूपामुळे स्पर्धकांची विषय समज, भाषेवरील प्रभुत्व, मांडणीची शैली आणि विचारांची स्पष्टता यांची कसोटी पाहिली गेली.

स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या ‘स्त्री–पुरुष समानता : समकालीन वास्तव’ या विषयावर अभय आळशी याने ७ मिनिटांच्या निर्धारित वेळेत अत्यंत प्रभावी, मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण भाषण केले. समाजातील बदलती मानसिकता, समानतेसमोरील आव्हाने, स्त्री–पुरुष समानतेचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून केलेला सखोल विचार यामुळे अभयचे भाषण विशेष ठरले. त्याच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने आणि स्पष्ट विचारमांडणीने परीक्षकांची मने जिंकली.

या स्पर्धेतील यशाबद्दल मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील पाटील यांनी अभय आळशी याचे अभिनंदन केले आहे. त्यांनी अभयच्या यशामुळे विद्यापीठाची मान उंचावल्याचे सांगत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अभय आळशी याला या स्पर्धेसाठी माजी विद्यार्थी व प्रथम पुरस्कारप्राप्त वक्ता विवेक वारभुवन तसेच सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे यांचे मार्गदर्शन लाभले. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि विषयाची सखोल तयारी यामुळे हे यश मिळाल्याचे अभयने सांगितले.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा आज; 31 केंद्रांवर विद्यार्थी देणार परीक्षा

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक स्पर्धांमध्ये सातत्याने घवघवीत यश मिळवून विद्यापीठाची परंपरा कायम ठेवली आहे. या वक्तृत्व स्पर्धेतील यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती कौशल्य, सामाजिक जाणीव आणि आत्मविश्वास वाढीस लागण्यास निश्चितच प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title: Mumbai university wins first place in the inter university elocution competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 03:07 PM

Topics:  

  • Mumbai University

संबंधित बातम्या

CDOE Admissions : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस अंतिम मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
1

CDOE Admissions : मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेस अंतिम मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
2

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.