Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनपा शाळेतील मुलं ठरली अव्वल! बॉक्सिंगमध्ये मिळवला सुवर्णपदक, कामगिरी अशी की थेट राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

शहाजीनगर मनपा हिंदी शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह दमदार कामगिरी करत राज्यस्तरासाठी मजल मारली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 15, 2025 | 04:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबई विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन
  • शहाजीनगर मनपा हिंदी शाळेच्या मुलींनीही स्पर्धेत चमक दाखवली
  • विभागीय स्तरावर मिळवलेले हे घवघवीत यश

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर आणि स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथे मुंबई विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहाजीनगर हिंदी शाळा, चित्ता कॅम्प येथील विद्यार्थ्यांनी जोरदार कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Boxing Championship)

नवी मुंबई विभागातील चार शाळांमध्ये महत्वाचा उपक्रम! मासिक पाळीबद्दल करण्यात येणार जागरूकता

या शाळेचे प्रतिभावान विद्यार्थी संदीप संतोष पासवान आणि विवेक मोहनलाल साकेत यांनी उत्कृष्ट तंत्र, वेग आणि निपुणतेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशामुळे त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभेद्य मार्ग मोकळा केला आहे. विशेष म्हणजे, याआधी तालुका आणि जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेतही या दोन्ही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत सातत्यपूर्ण खेळाची छाप पाडली होती. त्याच दमदार कामगिरीची पुनरावृत्ती विभागीय स्तरावर करून त्यांनी महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

फक्त मुलांनीच नव्हे, तर शहाजीनगर मनपा हिंदी शाळेच्या मुलींनीही स्पर्धेत चमक दाखवली. अनुष्का चव्हाण हिने कठोर मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर रौप्य पदक मिळवले, तर प्रियांका केवट हिने कांस्यपदक पटकावत स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुलींच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा कामगिरीत आणखी भर पडली आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण शिक्षक सुरेश दडस यांनी काटेकोर प्रशिक्षण दिले. कनिष्ठ शारीरिक शिक्षण पर्यवेक्षक किरण इंगळे आणि मुख्याध्यापक लक्ष्मण धनुष्यबाण यांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्यात आली. स्पर्धेतील त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशासन अधिकारी विद्या मॅडम, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख दत्तू लवटे, उपशिक्षणाधिकारी किरत कुडवे आणि शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले.

Science Centre Inauguration: मीरा-भाईंदरसहित संपूर्ण मुंबई विभागासाठी फायद्याचे! आता मनोरंजातून शिका विज्ञान

शहाजीनगर मनपा हिंदी शाळेने विभागीय स्तरावर मिळवलेले हे घवघवीत यश केवळ विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे फलित नसून शाळेतील क्रीडा संस्कृतीचेही द्योतक आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही हे विद्यार्थी अधिक उज्वल यश मिळवून शाळेचे नाव आणखी उंचावतील, अशी सर्वांनी आशा व्यक्त केली आहे.

Web Title: Municipal school children topped the list they won a gold medal in boxing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • muncipal corporation

संबंधित बातम्या

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल
1

Bhavana Ghanekar : उरण नगराध्यक्षपदासाठी भावना घाणेकरांचा अर्ज दाखल

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार
2

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.