फोटो सौजन्य - Social Media
नवी मुंबई विभागात आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उजास या उपक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वाच्या विषयावर जागरूकता करण्यात येणार आहे. आणि या उपक्रमाचा सामाजिकदृष्ट्या फार लाभ होणार असल्याचेही चित्रण दिसून येत आहे. या उपक्रमाकरिता ‘उजास आणि इवोनिक इंडिया’ दोघांमध्ये सामंजस्य करार झाला होता आणि दोघांच्या उत्स्फूर्त उपक्रमाने समाजाला फार काही शिकण्यासारखे मिळणार आहे. नवी मुंबईतील चार शाळांमध्ये मासिक पाळी स्वच्छतेवर जागरूकता उपक्रम राबवण्यात येणार आहे. (Ujas)
सामाजिक विषयांवर जागरूकता करत असताना ‘उजास आणि इवोनिक इंडिया’ यांनी ‘मासिक पाळी’ हा विषय का निवडला? यावर त्यांनी उद्दिष्टेही स्पष्ट केली आहेत. यामागे मुख्य उद्दिष्टे शालेय स्तरावर मासिक पाळीची चर्चा सामान्य करणे आहे. तसेच हा मुद्दा वैज्ञानिक असून त्याला सर्वसमावेशक करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच या विषयी जागरूकता करत असताना पाळीबाबतचा दडपलेला संवाद मोकळा करणे, शारीरिक बदल व मासिक पाळीबाबत वैज्ञानिक माहिती देणे, स्वच्छतेचे नियम, सुरक्षित उत्पादने, योग्य डिस्पोजल पद्धती शिकवणे तसेच मुलांना संवेदनशील व समजूतदार बनवणे या गोष्टींवर प्रमुख लक्ष देण्यात येणार आहे. (Aditya Birla Education Trust)
अशा प्रकारे असेल ‘उजास आणि इवोनिक इंडिया’चा नवा उपक्रम:
नवी मुंबईतील 4 शाळांना यामध्ये समाविष्ट करण्यात येत असून तेथे हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये 398 मुली तसेच 602 मुलांचा समावेश आहे आणि पालकांमधून ४० स्त्री पालक या उपक्रमात सहभाग घेणार आहेत. लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेतली तर ती १००० हून जास्त आहे. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत सॅनिटरी नॅपकिन्सचे वितरणही करण्यात येणार आहे. (Ujas and Evonik India)
उजास इम्पॅक्ट रिपोर्ट 2024–25 मधील निष्कर्ष






