Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साठये महाविद्यालय आणि पार्ले टिळक विद्यालयाकडून ‘राष्ट्रीय छात्र सेना’ दिवस उत्साहात साजरा!

NCC दिवसाचे औचित्य साधून साठये महाविद्यालय आणि पार्ले टिळक विद्यालयाच्या विद्यार्थांनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. शिस्तबद्ध पद्धतीने कवायती, प्रात्याक्षिके आणि त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन केले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 13, 2024 | 09:04 PM
साठये महाविद्यालय आणि पार्ले टिळक विद्यालयाकडून ‘राष्ट्रीय छात्र सेना’ दिवस उत्साहात साजरा!
Follow Us
Close
Follow Us:

१२ डिसेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय छात्र सेना’ (NCC ) दिवसाचे औचित्य साधून साठये महाविद्यालय आणि पार्ले टिळक विद्यालयाच्या विद्यार्थांनी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला. शिस्तबद्ध पद्धतीने कवायती, प्रात्याक्षिके आणि त्यासोबत सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन यामध्ये करण्यात आले.साठये महाविद्यालयाच्या नौदल आणि वायुदलाचे विद्यार्थी आणि सहकारी यांचा देखील या कार्यक्रमात सहभाग होता. यासोबतच डिफेन्स स्टडीज विभागातर्फे सैनिकी उपकरणांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.

या कार्यक्रमाला ८ महाराष्ट्र बटालियनचे कमान अधिकारी कर्नल नवीन शर्मा, ३ महाराष्ट्र बटालियनचे प्रसाकीय अधिकारी कर्नल प्रखर सिन्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे स्वागत पार्ले टिळक असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू आणि उपाध्यक्ष विनय जोग यांनी केले.साठये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत ३ वर्षांच्या डिफेन्स स्टडी या अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ‘देशभक्ती आणि संरक्षण दलात’ जाण्यासाठी असे कार्यक्रम प्रेरणादायी ठरतात,त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी हिरिरीने सहभाग घ्यावा असे आवाहन  केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. कॅप्टन गौरांग राजवाडकर आणि लेफ्टनंट कस्तुरी मेढेकर यांचे मार्गदर्शन वेळोवेळी विद्यार्थ्यांना लाभले. फर्स्ट ऑफिसर उमेश शिंदे तसेच पार्ले टिळक असोसिएशन संस्थेशी निगडीत सर्व प्राचार्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. पार्ले टिळक शाळा आणि साठये महाविद्यालयाचे ३०० विद्यार्थ्यांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला.

राष्ट्रीय छात्र सेना दिवस 

राष्ट्रीय छात्र सेनेची (एनसीसी)  स्थापना ही 1948 मध्ये झाली. एनसीसी ही जगातील सर्वात मोठी गणवेशधारी संघटना आहे. ही संघटना तरुण-तरुणींमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रवादासारख्या महत्त्वाच्या मूल्यांचा सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत आहे आणि  संस्मरणीय कार्य करत आहे. एनसीसी ही 75 हून जास्त वर्षे युवकांना घडणवारी एक महत्वाची संघटना आहे. देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते.

एनसीसीचे उद्दिष्ट

१९८८ मध्ये मांडण्यात आलेले एनसीसीचे ‘उद्दिष्ट’ काळाच्या कसोटीवर उतरले आहेत आणि देशाच्या सध्याच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत अपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करत आहेत. एनसीसीचे उद्दिष्ट तरुण नागरिकांमध्ये चारित्र्य, सहवास, शिस्त, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन, साहसाची भावना आणि निःस्वार्थ सेवेचे आदर्श विकसित करणे आहे. शिवाय, जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये नेतृत्वगुण असलेले संघटित, प्रशिक्षित आणि प्रेरित तरुणांचा समूह तयार करणे आहे, जे विद्यार्थ्यांनी कोणतेही करिअर निवडले तरीही राष्ट्राची सेवा करतील. हे सांगण्याची गरज नाही की एनसीसी तरुण भारतीयांना सशस्त्र दलात सामील होण्यासाठी प्रेरित करण्यासाठी अनुकूल वातावरण देखील प्रदान करत आहे.

भारत-पाक युध्‍दात NCC छात्रांचे योगदान

1965 आणि 1971 मध्‍ये भारत-पाकिस्‍तानमध्ये युद्ध झाले. त्यावेळी NCC छात्रांनी प्रत्‍यक्ष युध्‍दात सहभाग घेत मोलाची कामगिरी केली होती. एनसीसी छात्रांनी सैनिकांना हत्‍यार आणि गोळाबारुद पुरविणे, शस्‍त्रास्‍त्र निर्मितीमध्‍ये मदत करणे, शत्रूंच्‍या पॅराटूपर्सवर कब्‍जा करणे  आणि शहरामध्ये गस्‍त घालण्याचे कार्य चोख बजावले होते.

Web Title: Ncc day celebrated with enthusiasm by sathaye college and parle tilak vidyalaya

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 08:55 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित
1

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
2

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
3

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
4

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.