Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

स्वीकृत नगरसेवकपदासाठी दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नाराजी टाळण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर पडेल, अशी माहिती मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 23, 2026 | 04:48 PM
'स्वीकृत 'ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा (फोटो सौजन्य-Gemini)

'स्वीकृत 'ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:

वसई : वसई-विरार महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या दहा असून त्यातील सहा सत्ताधारी बहुजन विकास आघाडी तर चार भाजपच्या कोट्यातील नगरसेवक असणार आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नाराजी टाळण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर पडेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी देताना दोन्ही पक्षांकडून काही इच्छुकांना स्वीकृत नगरसेवक करू, असे आश्वासनही देऊन त्यांची मनधरणी करण्यात आली होती. त्यामुळे बविआ आणि भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे. यानिवडीत नाराजांची संख्या वाढण्याची भिती असणार आहे. परिणामी दोन्ही पक्षांना स्वीकृत नगरसेवकांची निवड करताना मोठे आव्हान असणार आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी बविआ आणि भाजपकडून सावध पवित्र घेतला जात आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी कोणतीही कालमर्यादा नाही. त्याचा फायदा उचलत स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलणे दोन्ही पक्षांच्या पथ्यावर पडणार आहे. काही काळानंतर इच्छुकांची संख्या कमी कमी होऊन आपल्या मर्जीतीलच स्वीकृत नगरसेवक करणेही सोपे जाणार आहे.

इच्छुकांची संख्या वाढली, ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर पडण्याची शक्यता… इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

पराभूतांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी नाही

आधीच इच्छुकांची संख्या वाढलेली आहे. त्यातच पराभूतांचा विचार केला तर नाराजांची संख्या वाढण्याचा धोका आहे. बहुजन विकास आघाडीकडून महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली जाण्याची खूपच कमी आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावरही काम करत आहोतच ना. मग, पराभूतांनीही पक्षाचे काम करून पुढच्यावेळी निवडून यावे, असे बविआ नेत्यांचे धोरण ठरल्याचे सांगितले जाते. तर भाजपचीही अशीच रणनिती असणार आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

वसई-विरार पालिकेत भाजप सक्षम विरोधक

साडेपाच वर्षानंतर महापालिकेचा कारभार लोकनियुक्त नगरसेवकांच्या हाती गेला आहे. महापालिका निवडणूकीत बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्येच सरळ लढत झाली. बविआने काँग्रेस, मनसेसोबत युती करत ७१ जागा जिंकत महापालिकेची तिसऱ्यांदा सत्ता काबिज केली आहे. तर महायुतीत भाजपने ४३ आणि शिंदे गटाने एक जागा जिंकत पहिल्यांदा महापालिकेत विरोधी पक्षांने जागा जिंकण्याचा विक्रम केला आहे. वसई विरारमध्ये भाजप प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पुढे येत असून बविआला सक्षम पर्याय निर्माण करण्यात भाजपने यश मिळवले आहे.

Konkan Ro-Ro Ferry: कोकणात जाणाऱ्या रो-रो फेरीचे तिकीट दर कमी करा, कोकणवासियांची मागणी 

Web Title: Approval selection delayed political parties tread carefully to avoid upsetting interested parties

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • BMC
  • BMC Election 2026
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला
1

Mumbai Credit Card: सणासुदीच्या खरेदीत मुंबईकर देशात अव्वल! क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर; ७७ टक्के शहरी भारतीयांचा खर्च वाढला

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान
2

Bal Drishti Scheme: अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांचे डोळे तर कमजोर नाहीत? मुंबई महापालिकेचा ‘बाल दृष्टी’ उपक्रम ठरतोय वरदान

Mumbai Bmc Camp : मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ दाखल्यांचे वितरण; नवीन मतदार नोंदणीसाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर
3

Mumbai Bmc Camp : मुंबईत ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ३७ दाखल्यांचे वितरण; नवीन मतदार नोंदणीसाठी किर्ती महाविद्यालयात शिबिर

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा
4

Sewage Tunnel : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! मलजल बोगद्याचे 90 टक्के काम पूर्ण; जुलै 2027 मध्ये मिळणार दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.