Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026: ‘पेपर फुटला तेव्हा नियम कुठे होते?’ नीट परीक्षेला उशीरा पोहचलेल्या मुलीच्या वडिलांचा प्रशासनाला थेट प्रश्न!

NEET UG 2026: नीट फेरपरीक्षेसाठी अवघ्या काही मिनिटांचा उशीर झाल्याने मध्य प्रदेशातील एका विद्यार्थिनीला प्रवेश नाकारण्यात आला. हताश वडिलांनी परीक्षा केंद्राच्या गेटवर डोकं आपटल्याचा भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 22, 2026 | 03:41 PM
VIRAL VIDEO

VIRAL VIDEO

Follow Us
Follow Us:

NEET UG 2026: डॉक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन विद्यार्थी नीट परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्राजवळ पोहचतात. परंतु काही वेळा अवघ्या काही मिनटाच्या उशीराने त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळत नाही. त्यावेळी त्यांना स्वप्न भंगल्यासारखे वाटते. अगदी अशीच परिस्थिती जेव्हा री-नीट परीक्षेच्या दिवशी एक मुलगी अवघ्या काही मिनिटांच्या विलंबाने परीक्षा केंद्रावर पोहोचली, तेव्हा तिच्यासोबत आलेल्या वडिलांचे जग जणू तिथेच थांबले. केंद्राबाहेर ते कधी हात जोडून अधिकाऱ्यांकडे गयावया करत होते की  ‘माझ्या मुलीला परीक्षा देऊ द्या.’ नीट फेरपरीक्षेसाठी उशिरा पोहोचल्यामुळे या विद्यार्थिनीला आत प्रवेश मिळू शकला नाही.

सोशल मीडियावर हा भावुक करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे, ज्यामध्ये एक वडील आपल्या मुलीला नीट परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचतात, परंतु त्यांना काही मिनिटांचा उशीर होतो. याच कारणामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विद्यार्थिनीचे वडील आधी परीक्षा केंद्राच्या लोखंडी गेटवर आपले डोके जोरात आपटतात, ज्यानंतर त्यांची मुलगी आणि इतर लोक त्यांना पकडतात. यावेळी त्या विद्यार्थिनीचीही रडून-रडून वाईट अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या उशिरामुळे विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रात प्रवेश न दिल्यामुळे आजूबाजूचे लोकही प्रशासनावर प्रचंड संतप्त झालेले दिसले.

 इसीलिए कहा जाता है कि परीक्षा के दिन समय का एक-एक मिनट बहुत कीमती होता है।

यह वीडियो RE-NEET परीक्षा का बताया जा रहा है, जिसमें एक लड़की अपने पिता के साथ परीक्षा केंद्र पर पहुंचती है, लेकिन कुछ देर हो जाने की वजह से नियमों के अनुसार उसे अंदर प्रवेश नहीं दिया जाता। पिता, जिसने… pic.twitter.com/JrUNkayz3x — ʀᴜᴅʜʀᴀ ʏᴀᴅᴀᴠ🇮🇳 (@Rudhrayadav001) June 22, 2026

नीट पेपर फुटीवर वडिलांचा संताप

वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा दिली होती. संतापलेल्या वडिलांनी म्हटले की, मागच्या वेळी परीक्षा दिली तेव्हा पेपर लीक (फूट) झाला; आता जर फक्त काही मिनिटांचा उशीर झाला तर परीक्षा केंद्रात जाऊ दिले जात नाहीये. जेव्हा पेपर लीक झाला तेव्हा सरकार कुठे होते, नियम कुठे होते? त्यामध्ये आमची काय चूक होती? हे बोलता बोलता वडील आणि मुलगी दोघेही ढसाढसा रडू लागले.

NEET UG 2026: ‘फसवणूक करणारा एकही जण वाचणार नाही!’ नीट फेरपरीक्षेतील गडबडीवर NTA महासंचालकांचा कडक इशारा; वाचा काय घडले

सर्व काही विकून मुलीला लावले होते नीटचे कोचिंग

सोशल मीडियावरील दाव्यानुसार, मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणाऱ्या या वडिलांनी आपल्या मुलीला नीटचे कोचिंग लावण्यासाठी आपले सर्व काही विकले होते. जमीन-जुमला विकून ते आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी तरेतर्हेचे काम करत होते. त्यांची मुलगी देखील नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करायची आणि घरापासून दूर असलेल्या कोचिंग क्लासला जायची. ३ मे रोजी आयोजित केलेल्या नीट परीक्षेत ती बसली होती, परंतु पेपर लीक झाल्यानंतर पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या नीट फेरपरीक्षेत मात्र तिला भाग घेता आला नाही.

Strait of Hormuz: होर्मुज स्ट्रेटमध्ये तणाव असतानाच भारतासाठी गूड न्यूज! ३ महाकाय ऑइल टँकर्स सुखरूप रवाना; पाहा किती लागतं इंधन?

Web Title: Neet ug 2026 student denied entry late emotional video vidisha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • NEET

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.