Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET UG 2026: नीट परीक्षेसाठी देशात पहिल्यांदाच एवढी कडक सुरक्षा! थेट मंत्रालयातून होणार लाईव्ह मॉनिटरिंग; पहा NTA चा मेगा प्लॅन!

NEET UG Re-Exam Security 2026: आज होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी NTA ने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. १.३८ लाख सीसीटीव्ही, ५१,००0 जॅमर्स आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर कसा होणार? वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 21, 2026 | 02:21 PM
नीट

नीट

Follow Us
Follow Us:

NEET UG Re-Exam 2026 Security Measures: नीट यूजी फेरपरीक्षा आज म्हणजेच २१ जून रोजी आयोजित केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एनटीएने (NTA) आपली तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा निष्पक्ष आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी एजन्सीने देशभरात अनेक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत.

आज होणारी ही परीक्षा देशातील ५५१ शहरांमध्ये आणि परदेशातील १४ शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. परीक्षेसाठी ५,४४० केंद्रे तयार करण्यात आली असून, यामध्ये २२ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

सीसीटीव्ही (CCTV) आणि एआय (AI) च्या मदतीने होणार देखरेख

परीक्षा केंद्र आणि वर्गांवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. एकूण १.३८ लाखांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय, राज्य आणि मंत्रालय पातळीवर देखरेख ठेवली जात आहे. तसेच आज परीक्षा वर्गांच्या लाइव्ह फुटेजवर सतत लक्ष ठेवले जाणार असून, यासोबतच एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित सिस्टम देखील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करेल; जेणेकरून कोणतीही संशयास्पद हालचाल तात्काळ ओळखून कारवाई करता येईल. परीक्षा केंद्रांवर सुमारे ६,७०० ऑब्झर्व्हर्स (पर्यवेक्षक) तैनात करण्यात आले आहेत, तर १०० हून अधिक व्हर्च्युअल ऑब्झर्व्हर्स केंद्रीय पातळीवरून लाइव्ह मॉनिटरिंग करणार आहेत.

जॅमर्समुळे इलेक्ट्रॉनिक गडबडीला बसणार आळा

इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी देशभरात ५१,००० हून अधिक जॅमर्स बसवण्यात आले आहेत. NTA नुसार, जॅमर्सच्या मदतीने परीक्षा केंद्रांवर मोबाईल नेटवर्क आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर प्रभावी नियंत्रण ठेवले जाईल, ज्यामुळे परीक्षेची गोपनीयता कायम राहील.

NEET UG Re-Exam: नीट परीक्षेसाठी कडक नियमावली! १:३० नंतर नो एंट्री; केंद्रावर जाताना ‘या’ गोष्टी ठेवा सोबत

बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे होणार ओळख पटवणे

विद्यार्थ्यांची ओळख सुनिश्चित करण्यासाठी यंदा बायोमेट्रिक पडताळणी (वेरिफिकेशन) व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे. सुमारे ४८,००० हून अधिक कर्मचारी बायोमेट्रिक पडताळणीच्या कामात लावण्यात आले आहेत. यासोबतच फेस ऑथेंटिकेशन (चेहरा ओळखण्याची) तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. केंद्रांवर प्रवेश देण्यापूर्वी उमेदवारांची कसून तपासणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे ३८,००० फ्रिस्किंग स्टाफ (तपासणी कर्मचारी) तैनात करण्यात आला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर ४० ते ५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

International Yoga Day: योग दिनासाठी २१ जून हीच तारीख का निवडली? जाणून घ्या यामागचे रंजक कारण..

ओएमआर (OMR) शीट आणि प्रश्नपत्रिकांवर विशेष लक्ष

देशभरातील शेकडो सेंटर्सवरून ओएमआर शीट्स गोळा करण्याची जबाबदारी टपाल विभाग सांभाळणार आहे. NTA ने परीक्षेपूर्वी देशव्यापी मॉक ड्रिल देखील आयोजित केले होते, ज्यामध्ये सीसीटीव्ही, जॅमर्स, बायोमेट्रिक सिस्टम, तपासणी प्रक्रिया आणि परीक्षा साहित्याची उपलब्धता यांची पडताळणी करण्यात आली.

Web Title: Neet ug re exam 2026 security measures ai cctv jammer details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • NEET

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.