Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET OMR Sheet Glitch: ६५० वरून विद्यार्थ्याचे गुण थेट १३५ वर आले! नीट निकालातील अजब घोळावरून सुरू झाला नवा वाद

NEET OMR Sheet Glitch: नीट यूजी परीक्षेच्या निकालात मोठा घोळ! विद्यार्थ्याचे गुण २४ तासांत ६५० वरून थेट १३५ वर आले. ओएमआर शीटच्या वादाची संपूर्ण माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 30, 2026 | 03:56 PM
neet

neet

Follow Us
Follow Us:

NEET OMR Sheet Glitch:  नॅशनल टेस्टिंग एजन्सी आधीच नीट पेपरफुटीच्या वादामुळे अडचणीत सापडली आहे. त्यातच आता नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतरही एनटीएच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ओएमआर शीट आणि निकालातील त्रुटींमुळे एनटीएच्या एकूणच कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे ताजे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर समोर आले आहे. एका विद्यार्थ्याने एनटीएच्या मूल्यमापन प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे.

दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेनुसार, विद्यार्थ्याचे नीटचे गुण २४ तासांत तब्बल ३ वेळा बदलण्यात आले. तसेच एनटीएच्या पोर्टलवर दाखवण्यात आलेली उत्तरपत्रिका ही ती नाही, जी विद्यार्थ्याने परीक्षेच्या दिवशी भरली होती, असा दावाही करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊया नीट ओएमआर शीट आणि निकालातील या त्रुटींशी संबंधित संपूर्ण प्रकरण….

विद्यार्थ्याची तक्रार: २४ तासांत ३ वेळा बदलले नंबर

नीट यूजी २०२६ च्या पुनर्रपरीक्षेत बसलेल्या एका विद्यार्थ्याचा दावा आहे की, NTA च्या अधिकृत निकाल पोर्टलवर २४ तासांच्या आत ३ वेळा त्याचे गुण बदलले गेले. पहिल्यांदा जेव्हा त्याने नीट पुनर्रपरीक्षेचा निकाल पाहिला, तेव्हा त्याचा स्कोर ६५० होता. त्यानंतर काही वेळाने तो कमी होऊन ५०० झाला. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा पुन्हा निकाल पाहिला, तेव्हा मूळ ६५० असलेले गुण थेट १३५ वर आले. विद्यार्थ्याचा असाही दावा आहे की, पोर्टलवर जी उत्तरपत्रिका दिसतेय ती परीक्षेच्या दिवशी सादर केलेल्या उत्तरपत्रिकेपेक्षा वेगळी आहे. अ‍ॅडव्होकेट विनीत जिंदल यांच्यामार्फत या विद्यार्थ्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

NTA ला निर्देश देण्याची मागणी

विद्यार्थ्याने दाखल केलेल्या याचिकेत NTA ला त्याची मूळ भौतिक OMR उत्तरपत्रिका आणि परीक्षेशी संबंधित इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेचा मुख्य उद्देश मूल्यमापन प्रक्रियेची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी हा आहे.

Commercial Pilots in India: भारतात दर चौथा कमर्शियल पायलट महिला! पायलट बनण्यासाठी नेमकी काय पात्रता लागते? जाणून घ्या

फक्त गुणच नाही, तर परीक्षेच्या तारखेतही घोळ!

याचिकेशी संबंधित माहितीनुसार, विद्यार्थ्याच्या विरोधानंतरही एनटीए अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या रेकॉर्डमध्ये हीच OMR शीट आणि कागदपत्रे उपलब्ध आहेत, जी कोर्टासमोर सादर केली जातील. त्यानंतर विद्यार्थ्याला ईमेल केलेली ओएमआर शीट अजूनही शंकास्पद दिसत आहे.

गंभीर बाब म्हणजे, हा घोळ केवळ ओएमआर किंवा गुणांपुरता मर्यादित नाही, तर ओएमआर शीटवर परीक्षेची तारीख २१ जून २०२६ ऐवजी २१ जुलै २०२६ अशी दिसत आहे, तर प्रत्यक्षात NEET UG री-एग्झाम २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली होती.

Government Jobs 2026: १० वी उत्तीर्ण ते पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; येत्या काही महिन्यांत ‘या’ मोठ्या सरकारी पदांसाठी बंपर भरती

१६ जुलैला पाहिला निकाल, पुढील दिवशी बदलला स्कोर

विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, १६ जुलै २०२६ रोजी नीट यूजी पुनर्रपरीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. जेव्हा त्याने एनटीएच्या अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून निकाल पाहिला, तेव्हा त्याला ६५० गुण दिसले. लॉगआउट करून पुन्हा लॉगिन केले असता ५०० गुण दिसले आणि पुढील दिवशी पुन्हा तपासले असता ते गुण थेट १३५ वर आले. यासंदर्भात विद्यार्थ्याने प्रथम NTA कडे तक्रार केली होती. आता हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचले असून, यावर ३१ जुलै, शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Neet ug result 2026 omr sheet glitch score changed three times delhi high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 03:56 PM

Topics:  

  • NEET
  • NEET exam scam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.