फोटो सौजन्य - Social Media
एनएचपीसी लिमिटेड (NHPC Limited) ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखालील एक अग्रगण्य नवरत्न सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असून, त्यांनी 2025 साठी अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे देशभरातील विविध एनएचपीसी युनिट्समध्ये एकूण 361 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यात ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ITI अप्रेंटिस पदांचा समावेश असून, प्रत्येक उमेदवारासाठी प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल. ही संधी उमेदवारांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव मिळवण्यासाठी उत्तम आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी प्रथम NATS (Graduate/Diploma) किंवा NAPS (ITI) पोर्टलवर नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर www.nhpcindia.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची प्रक्रिया 11 जुलै 2025 पासून सुरू होत असून 11 ऑगस्ट 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. उमेदवारांची निवड कोणतीही मुलाखत न घेता फक्त शैक्षणिक गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. Graduate Apprentice साठी 10वी (20%), 12वी/Diploma (20%) आणि डिग्री (60%) गुण विचारात घेतले जातील. Diploma Apprentice साठी 10वी (30%) + Diploma (70%) आणि ITI Apprentice साठी 10वी (30%) + ITI (70%) या प्रमाणे गुणांचे वाटप केले जाईल.
या भरतीअंतर्गत Graduate Apprentice पदासाठी एकूण 148, Diploma साठी 82 आणि ITI साठी 131 जागा असून, त्यासाठी अनुक्रमे ₹15,000, ₹13,500 आणि ₹12,000 दरमहा मानधन (stipend) दिले जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही वयोमर्यादे संदर्भात असणारे निकष पात्र करावे लागणार आहेत. हे निकष जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. त्या निकषांनुसार, उमेदवारांचे वय 11 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षांदरम्यान असावे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि दिव्यांग प्रवर्गासाठी वयात शासकीय नियमानुसार सवलत देण्यात येईल.
अर्ज करताना उमेदवारांनी आपले काही आवश्यक असणारे आणि महत्वचेव असणारे अधिकृत दस्तऐवजांची पडताळणी तसेच सादर करावे लागणार आहेत. यामध्ये NATS/NAPS नोंदणी पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, 10वीचा जन्मदाखला, फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र अपलोड करावे लागेल. एनएचपीसीमध्ये अप्रेंटिस म्हणून काम करणे ही केवळ नोकरीची नाही, तर एक प्रतिष्ठेची आणि शाश्वत करिअर घडवणारी संधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज सादर करून ही सुवर्णसंधी हातून जाऊ द्यायची नाही.