फोटो सौजन्य - Social Media
सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे तंत्रज्ञान प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे अनेक पारंपरिक नोकर्या धोक्यात आल्या आहेत, विशेषतः एंट्री-लेव्हल वाइट कॉलर जॉब्स. काही अंदाजांनुसार पुढील ५ वर्षांत अशा नोकर्यांपैकी बराच मोठा भाग ऑटोमेशनमुळे नष्ट होऊ शकतो. मात्र घाबरण्याचं कारण नाही, कारण अजूनही काही क्षेत्रं अशी आहेत जी AI च्या प्रभावापासून सुरक्षित आहेत. या क्षेत्रांना “न्यू कॉलर जॉब्स” असं म्हटलं जातं आणि यामध्ये कमाईही मोठी ८० लाखांपर्यंत होऊ शकते.
चला जाणून घेऊया अशी ५ क्षेत्रं, जिथे AI सुद्धा नोकरी घेऊ शकणार नाही:
इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अॅनालिस्ट
डिजिटल युगात सायबर हल्ले, डेटा चोरी यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी कंपन्यांना सिक्युरिटी अॅनालिस्ट लागतात. हे तज्ज्ञ सिस्टममध्ये कमतरता शोधून ती दुरुस्त करतात. AI फक्त सहाय्यक ठरतो, पण रिअल-टाइम निर्णय घेणं मानवांचंच काम आहे.
हेल्थ सर्व्हिस मॅनेजर
रुग्णालय चालवताना डॉक्टरांइतकंच महत्व व्यवस्थापन टीमचं असतं. बजेट, नियम, स्टाफ मॅनेजमेंट हे सगळं मॅनेजर करत असतो. यात मानवसंपर्क, समजूत आणि अनुभव फार महत्वाचे आहेत, जे AI करू शकत नाही.
ब्रँड स्ट्रॅटेजिस्ट / मार्केटिंग लीडर
ब्रँड फक्त डेटा किंवा ट्रेंडवर तयार होत नाही. त्यासाठी इमोशन, स्टोरीटेलिंग, टीम लीडिंग आणि क्रिएटिव व्हिजन आवश्यक आहे. AI विश्लेषण करू शकतो, पण ब्रँडसाठी हृदयापासून विचार करणं त्याच्या आवाक्याबाहेर आहे.
सेल्स इंजिनिअर
तांत्रिक उत्पादनांची माहिती घेऊन ती ग्राहकाला समजावून सांगणं हे सेल्स इंजिनिअरचं प्रमुख काम. ग्राहकाच्या गरजेनुसार सोल्युशन देणं, संवाद साधणं, नातं निर्माण करणं – हे सगळं AI करत नाही.
नेटवर्क आर्किटेक्ट / IT प्लॅनर
क्लाउड, डेटा ट्रॅफिक, नेटवर्क डिझाइन यासाठी कल्पकता, दूरदृष्टी आणि योजना करण्याची क्षमता लागते. AI ऑप्टिमायझेशन करू शकतो, पण सुरवातीची योजना, ट्रबलशूटिंग आणि मोठी प्लॅनिंग ही माणसांची गरजच राहणार.