career (फोटो सौजन्य : social media)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल लर्निंग (NIOS) ने ऑक्टोबर-नोव्हेंबर सत्रात होणाऱ्या इयत्ता १०वी आणि इयत्ता १२वीच्या परीक्षांसाठी प्रवेशपत्रे बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी जारी केली आहे. जाणून घ्या कसे कराल प्रवेशपत्र डाउनलोड?
कधी असेल परीक्षा?
दहावी आणि बारावीच्या ही परीक्षा १४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होतील. ही परीक्षा एकाच शिफ्टमध्ये दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत घेतली जाईल. दहावीचा पहिला पेपर संस्कृत साहित्य आणि उद्योजकता आहे, तर बारावीचा पहिला पेपर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन आहे.
कसे करू शकता प्रवेशपत्र डाउनलोड
जे विध्यार्थी परीक्षेला बसलेत ते sdmis.nios.ac.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
मुंबई मनपातील शिक्षकांच्या प्रश्नाबाबत गुरूवारी बैठक, BJP चे अनिल बोरनारे मांडणार शिक्षकांचे प्रश्न
जनरलिस्ट ऑफिसर परीक्षेचा हॉल तिकीट जारी, 12 ऑक्टोबरला होणार परीक्षा?
बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) द्वारा १२ ऑक्टोबर २०२५ ला जनरलिस्ट ऑफिसर पदासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज केलेले उमेदवार रविवार, १२ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षेला बसण्यास पात्र असतील. एकूण ५०० पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड केलेले नाही त्यांनी त्वरित ते डाउनलोड करावे. ज्यांच्याकडे हॉल तिकीट नसेल ते परीक्षेला बसू शकणार नाहीत. जनरलिस्ट ऑफिसर भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे आणि परीक्षेचा पॅटर्न काय आहे? चला जाणून घेऊया.
परीक्षेचा पॅटर्न काय आहे?
बँक ऑफ महाराष्ट्र जनरलिस्ट ऑफिसर भरतीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. लेखी परीक्षा ही एकूण १५० गुणांची असेल. ज्यात इंग्रजी, तर्क आणि व्यावसायिक ज्ञानाचे प्रश्न असतील. ही परीक्षा २ तास चालणार आहे. या परीक्षेत प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुणांचे नकारात्मक गुण देखील दिले जातात. १५० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला यशस्वी मानले जाईल आणि मुलाखतीनंतरच निवड केली जाईल.