फोटो सौजन्य - Social media
दरवर्षी भारतात अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी विविध आयोजित परीक्षांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवतात. या परीक्षेत नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET), जॉईन एंट्रन्स टेस्ट (JEE) तसेच बँकिंग क्षेत्रातील शैक्षणिक परीक्षेचा समावेश होतो. या परीक्षेत दरवर्षी विद्यार्थी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात. या परीक्षांची तयारी करण्यामागे हजारो-लाखोंच्या रक्कमेत खर्च करतात. एकंदरीत, NEET, JEE तसेच बँकिंग क्षेत्रातील परीक्षांची तयारी करवून घेणारे देशातील टॉप बेस्ट संस्थान प्रत्येक मध्यम वर्गीय कुटुंबाला परवडण्यायोगी नसतात. या कोचिंग क्लासेसची भरमसाठ फीचे वजन झेपण्याची प्रत्येकाची परिस्थिती नसते. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षांमध्ये भाग घेऊन त्यांना उत्तीर्ण करायचे आहे, खास त्यांच्यासाठी भारतीय शिक्षण विभागाने एक उपक्रम राबवला आहे.
आता SSC, बँकिंग, वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडवू इच्छुक असणाऱ्या प्रत्येक अभ्यार्थ्याला देशातील नामांकित तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासाविषयी शिकवणीही मिळणार आहे. विशेष म्हणजे भारतीय शासनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत असणार आहे. भारतीय शासनातील शिक्षण विभागाने या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यांनी ‘SATHEE’ (Self Assessment Test and Help for Entrance Exams) नावाचं एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरु केले आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यंना प्रचंड प्रमाणात फायदा होणार आहे.
चार पाच दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्रालयाने बँकिंग सर्व्हिसेस परीक्षेविषयी शिकवणी साथी वेब पोर्टलवर अपलोड केली आहे. त्याचबरोबर शासनाच्या साथी या वेब प्लॅटफॉर्मवर कॉमन लॉ ऍडमिशन टेस्ट (CLAT) तसेच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) परीक्षेसंदर्भात तयारी लवकरच पाहायला मिळेल अशी अशा व्यक्त केली जात आहे.
हे सुद्धा वाचा : राज्यातील ‘या’ महानगरपालिकेमध्ये थेट मुलाखतीद्वारे मिळणार नोकरी, पगार 60 हजार रुपयापर्यंत
शिक्षण मंत्रालयातील उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव गोविंद जयस्वाल म्हणतात की, “‘साथी’ प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस, नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) बद्दल व्हिडीओ सोल्युशन, AI वर आधारित असेसमेंट प्लॅटफॉर्म, जवळजवळ सगळ्या IIT प्रोफेसर यांचे व्हिडीओ लेक्चर, IIT AIMS च्या माजी विद्यार्थ्यांच्या अनुभव तसेच मार्गदर्शनासंबंधित पर्याय उपलब्ध करून दिले जातील.” त्यांनी विशेष या बाबीचा उल्लेख केला कि साथी शासनाचा शैक्षणिक प्लॅटफॉर्म असून याच्या वापराकरिता विद्यार्थ्यंकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच बँकिंग क्षेत्रासंबंधित परीक्षांमध्ये सहभाग घेऊ इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तयारीसाठीही मार्गदर्शन पुरवले जाणार आहे.