फोटो सौजन्य- iStock
राज्यातील लातूर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया लातूर शहर महानगरपालिका एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी होणार आहे. वैद्यकीय अधिकारी, नर्स, पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
पदे आणि जागा
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी- 05 जागा
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी-04 जागा,
स्टाफ नर्स-02 जागा
पब्लिक हेल्थ मॅनेजर-01 जागा.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
वर नमूद केलेल्या सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता नमूद केलेली असून इच्छुक उमेदवाराने अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात वाचावी आणि त्यानंतर अर्ज सादर करावा.
पात्र उमेदवाराला वेतन हे त्या त्या पदा नुसार देण्यात येणार असून 20000 ते 60000 पर्यंत दिला जाईल. जाहिरातीमध्ये पदानुसार वेतन दिले गेले आहे.
नोकरीचे ठिकाण
लातूर महानगरपालिका,लातूर
अर्ज प्रक्रिया आणि अर्ज पत्ता
इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. हा अर्ज उमेदवाराने नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका लातूर या पत्त्यावर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
स्टाफ नर्स आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदांसाठी उमेदवारांनी 21 ऑगस्ट 2024 संध्याकाळी 5.45 पर्यंत वरील पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी 27 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज आणि कागदपत्रांसोबत वरील पत्त्यावर सकाळी 10 वाजता उपस्थित राहायचे आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना