Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत 38 टक्के घट; जाणून घ्या काय आहेत प्रमुख कारणे

अमेरिकेत शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत तब्बल 38 टक्क्यांनी घट झाली आहे. ही घट मागील काही दशकातील विद्यार्थ्यांच्या संख्येतील मोठी घट आहे. जाणून घेऊया यासंबंधी प्रमुख कारणे काय आहेत त्याबद्दल.

  • By नारायण परब
Updated On: Dec 09, 2024 | 04:24 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांच्या विद्यार्थीसंख्येत मोठी घट झाल्याचे समोर येत आहे. युएस स्टेट डिपार्टमेंटनुसार, या वर्षीच्या पहिल्या 9 महिन्यांत भारतीयांना जारी केलेल्या F1 व्हिसामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 38 टक्के घट झाली आहे. कोविड महामारीनंतर अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घट होताना दिसून आले आहे. या वर्षी तर यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. या घटीचे कारण काय आहे हे जाणून घेऊया?

प्रमुख कारणे

अनेक दशकांपासून भारतीय विद्यार्थी पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील शिक्षणसंस्थांना प्राधान्य देत आहेत. दरम्यान कोविडनंतर कमी झालेला ओढा हा  विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांचा दीर्घकाळ प्रतीक्षा कालावधी आणि व्हिसाशी संबंधित चिंता या गोष्टी कारणीभूत असल्याचे मानले जाते. तसेच आता अमेरिकेत शिक्षणापेक्षा  बहुतेक विद्यार्थी कॅनडा, यूके, न्युझीलंड आणि जर्मनी सारख्या देशांना शिक्षणासाठी प्राध्यान्य देत आहेत. अमेरिकेतील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये झालेली  घसरण  ही केवळ भारतीय विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही. तर भारताव्यतिरिक्त इतर देशांतील विद्यार्थ्यांमध्येही घट झाली आहे.

सेंट्रल अग्रिलेक्चर युनिव्हर्सिटीमध्ये रोजगाराची संधी; फॅकल्टी पदासाठी व्हॅकन्सी

भारतीय विद्यार्थी आणि अमेरिकन व्हिसा ( 2020 ते 2024 )

अहवालानुसार, 2024 च्या जानेवारी ते सप्टेंबर या दरम्यान  64,008 भारतीय विद्यार्थ्यांना  व्हिसा जारी करण्यात आले होते, तर 2023 मध्ये याच कालावधीत ही संख्या तब्बल 1,03,495 होती. त्याअगोदर म्हणजे 2022 मध्ये ही संख्या 93,181 इतकी होती. 2021 मध्ये याच कालावधीत 65,235 भारतीयांना विद्यार्थी व्हिसा जारी करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात, 2020 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत भारतीयांना फक्त 6,646 F-1 व्हिसा जारी करण्यात आले होते. 2021 ते 23 या तीन वर्षाच्या तुलनेत भारतीयांची यावर्षी झालेली घट आकडेवारीनुसार दिसून येते. कोविडनंतर  ही घसरण नीचांकी पातळीवर पोहोचली आहे.

Work from home: परदेशी कंपनीत घरातून काम करत मिळवा लाखोंचे पॅकेज; ‘या’ नोकऱ्या ठरत आहे सर्वोत्तम पर्याय

चीनच्या विद्यार्थ्यांमध्येही  घट

अमेरिकेमध्ये भारतासहित चीनचे विद्यार्थी ही मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी प्राधान्य देत असत मात्र आता  चिनी विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी  8 टक्के कमी चिनी विद्यार्थी अमेरिकेत पोहोचले. 2023-24 मध्ये, अमेरिकन विद्यापिठांमध्ये मागील वर्षी भारतीय विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख म्हणजे 3,31,000 च्या वर गेली होती जी एकूण आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या 29.4 टक्के आहे. त्यामुळे मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्याबाबतीत भारतीय विद्यार्थ्यांनी चीनलाही मागे टाकले होते.

F-1 व्हिसा

F-1 व्हिसा म्हणजे अमेरिकेमधील  शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नॉन-इमिग्रंट श्रेणी आहे. तर M-1 व्हिसामध्ये व्यवसाय आणि गैर-शैक्षणिक कार्यक्रमांचा समावेश असतो.  डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेच्या व्हिसाच्या नियमांमध्ये अजून कठोरता येऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा परदेशातील शिक्षणासंबंधी बदलता कल कायम राहू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Number of indian students in america decreased by 38 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 04:24 PM

Topics:  

  • USA

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.