फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. फॅकल्टीच्या पदासाठी काम करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही CAU च्या या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर या जाहीर अधिसूचनेचा नक्की आढावा घेण्यात यावा. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. तसेच उमेदवारांनाही अधिसूचना ऑनलाईन स्वरूपात वाचता व डाउनलोड करता येणार आहे. यामध्ये या भरतीविषयक सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती संदर्भात संपूर्ण आणि सखोल माहिती या लेखातून.
CAU च्या या भरतीसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २६ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेची मर्यादा लक्षात घेऊन उमेदवारांनी अर्ज करण्यात यावे. CAU च्या या भरतीमध्ये एकूण १०७ रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यातील ८८ रिक्त जागांसाठी प्रोफेसर पदी उमेदवारांची निवड केली जाईल. तर असोसिएट प्रोफेसर पदासाठी एकूण १९ जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भांत तसेच शिक्षणासंदर्भात आहेत. या भरतीसाठी कमाल आयुमर्यादा ६५ निश्चित करण्यात आली आहे. एकंदरीत, जास्तीत जास्त ६५ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मुळात, काही आरक्षित वर्गांना अर्ज शुल्क माफ आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून १००० रुपये भरावे लागणार आहेत. तसेच OBC आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. PWD या आरक्षित परवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच महिलांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.
अशा प्रकारे करता येईल अर्ज