फोटो सौजन्य - Social Media
पवन हंस लिमिटेडने विविध पदांसाठी भरती जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 23 पदे भरली जाणार आहेत. यात स्टेशन मॅनेजर, असोसिएट फ्लाइट इंजिनियर, सेफ्टी ऑफिसर, डिप्टी चीफ ऑफ फ्लाइट सेफ्टी, क्वालिटी मॅनेजर आणि इतर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाची पद्धत यासंदर्भातील सविस्तर माहिती खाली दिली आहे.
पदांचा तपशील
या भरती प्रक्रियेत डिप्टी चीफ ऑफ फ्लाइट सेफ्टी (E-6) – 2, सीएएम (E-4) – 1, क्वालिटी मॅनेजर (E-4) – 1, एअर सेफ्टी ऑफिसर (E-4) – 1, डिप्टी सीएएम – 2, डिप्टी क्वालिटी मॅनेजर (E-3) – 1, स्टेशन मॅनेजर (E-1) – 7, असोसिएट फ्लाइट इंजिनियर (E-2) – 5, सेफ्टी ऑफिसर (E-1) – 2 आणि इंजिनियर एअर कंट्रोलिंग (E-1) – 1 अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
डिप्टी चीफ ऑफ फ्लाइट सेफ्टी (E-6) पदासाठी उमेदवाराकडे एरोनॉटिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, विमानन क्षेत्रातील किमान 12 वर्षांचा अनुभव असावा आणि त्यापैकी किमान 3 वर्षे अपघात तपासणी आणि सुरक्षा ऑडिटमध्ये असणे गरजेचे आहे. इतर पदांसाठी आवश्यक पात्रतेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना पाहावी.
वयोमर्यादा पदांनुसार भिन्न आहे. डिप्टी चीफ ऑफ फ्लाइट सेफ्टी (E-6) साठी कमाल वयोमर्यादा 55 वर्षे, सीएएम (E-4), क्वालिटी मॅनेजर (E-4) आणि एअर सेफ्टी ऑफिसर (E-4) साठी 45 वर्षे, डिप्टी सीएएम आणि डिप्टी क्वालिटी मॅनेजर (E-3) साठी 35 वर्षे, स्टेशन मॅनेजर (E-1), सेफ्टी ऑफिसर (E-1) आणि इंजिनियर एअर कंट्रोलिंग (E-1) साठी 30 वर्षे, तर असोसिएट फ्लाइट इंजिनियर (E-2) साठी 18 ते 65 वर्षे ठेवण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया आणि अर्ज पद्धत
उमेदवारांची निवड अर्जांची शॉर्टलिस्टिंग, वैयक्तिक मुलाखत आणि आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीद्वारे केली जाणार आहे. अर्ज शुल्क सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी ₹295 असून SC/ST उमेदवारांसाठी अर्ज मोफत आहे. इच्छुक उमेदवार पवन हंस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2025 आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.pawanhans.co.in येथे भेट द्यावी.