फोटो सौजन्य - Social Media
भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयांतर्गत येणारी पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) तर्फे अप्रेंटिस पदभरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत एकूण 1160 पदे उपलब्ध असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. अप्रेंटिसशिप कालावधी एक वर्षाचा असेल.
या भरतीत ग्रॅज्युएट (इलेक्ट्रिकल/सिव्हिल), डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/सिव्हिल), आयटीआय (इलेक्ट्रीशियन), एचआर एक्झिक्युटिव्ह, राजभाषा व एक्झिक्युटिव्ह लॉ या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर कसलाही वेळ न दवडता आजच अर्ज करा.
प्रमुख राज्यनिहाय पदसंख्या:
बिहार (ERTS-I) मध्ये 55 जागा रिक्त आहेत. झारखंड (ERTS-I) मध्ये 20 जागा रिक्त आहेत. जम्मू व काश्मीर (NR-II) मध्ये 32 जागा रिक्त आहेत. हरियाणा मध्ये 8 जागा रिक्त आहेत. पंजाबमध्ये 24 जागा रिक्त आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये 12 जागा रिक्त आहेत. चंदीगडमध्ये 4 तर लडाखमध्ये 11 जागा रिक्त आहेत. फरीदाबाद (NR-I)मध्ये 199 जागा रिक्त आहेत. पश्चिम बंगाल (ERTS-II)मध्ये 55 जागा रिक्त आहेत.
इतर राज्यांतील पदांची माहिती उमेदवारांना अधिकृत अधिसूचनेतून मिळेल.
शैक्षणिक पात्रता
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार सूट मिळेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मेरिट यादीच्या आधारे होईल. यासाठी NATS/NAPS वेबसाईटवर त्रिपक्षीय अप्रेंटिसशिप करार करणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवारांना वैद्यकीय प्रमाणपत्र आणि पोलिस पडताळणी आवश्यक असेल.
स्टायपेंड
डिप्लोमा अप्रेंटिस: ₹4000 प्रतिमहिना
ग्रॅज्युएट अप्रेंटिस: ₹4500 प्रतिमहिना
ही रक्कम भारत सरकारच्या NATS योजनेअंतर्गत DBT पद्धतीने दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑक्टोबर 2025 आहे. अधिक माहितीसाठी व अधिसूचना पाहण्यासाठी www.powergrid.in या लिंकवर भेट द्या.