Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेडिओलॉजीमध्ये डिप्लोमा करा! काय आहेत पात्रता निकष? जाणून घ्या

रेडिओलॉजी मध्ये घडवा भविष्य! करिअरची मोठी संधी! पण काय असतात पात्रता निकष? काय असतात इतर प्रक्रिया? जाणून घ्या संपूर्ण माहिती सविस्तर!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 19, 2026 | 04:21 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी रेडिओलॉजीमधील डिप्लोमा हा एक उत्तम आणि व्यावहारिक पर्याय ठरत आहे. MBBS सारख्या दीर्घ आणि खर्चिक अभ्यासक्रमाऐवजी कमी कालावधीत तांत्रिक कौशल्य मिळवून करिअर घडवायचे असेल, तर हा कोर्स विशेष फायदेशीर ठरतो. साधारणपणे २ वर्षांचा हा अभ्यासक्रम पॅरामेडिकल क्षेत्रात येतो आणि सध्याच्या हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये त्याला मोठी मागणी आहे.

या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाची सखोल ओळख करून दिली जाते. रेडिएशन फिजिक्स, क्ष-किरणांचे (X-ray) गुणधर्म, एमआरआय, अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन, इमेज प्रोसेसिंग टेक्निक्स आणि डायग्नोस्टिक रेडिओलॉजीमधील ऍनेस्थेटिक्स यांसारखे महत्त्वाचे विषय अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. यामुळे विद्यार्थ्यांना रुग्णांच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणांचे ज्ञान मिळते आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर करण्याचे कौशल्य विकसित होते.

आयआयआरएसमध्ये विविध अभ्यासक्रम! PGD आणि MSc अभ्यासक्रमांची संधी उपलब्ध

पात्रता निकष

या डिप्लोमा कोर्ससाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे विषय बारावीत असणे गरजेचे आहे. तसेच किमान ५० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. काही संस्थांमध्ये गुणांच्या आधारे थेट प्रवेश दिला जातो, तर काही ठिकाणी प्रवेश परीक्षा देखील घेतली जाते.

प्रवेश प्रक्रिया

रेडिओलॉजी कोर्समध्ये प्रवेश प्रामुख्याने दोन पद्धतींनी दिला जातो. मेरिट (गुणवत्ता) आणि प्रवेश परीक्षा. बारावीत चांगले गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटच्या आधारे थेट प्रवेश मिळू शकतो. याशिवाय, काही शैक्षणिक संस्था स्वतःची प्रवेश परीक्षा आयोजित करतात आणि त्या परीक्षेतील गुणांनुसार प्रवेश दिला जातो.

Success Story : “मानसिकदृष्ट्या स्वतःची तयारी करा” स्वयं-अभ्यासामुळे IAS! दुसऱ्या प्रयत्नात मिळवले यश

करिअरच्या संधी

हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. रेडिओग्राफर, एमआरआय तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, तसेच पुढील शिक्षण घेतल्यास रेडिओलॉजिस्ट म्हणूनही करिअर करता येते. याशिवाय, अनुभव मिळाल्यानंतर शिक्षक किंवा व्याख्याता म्हणूनही काम करण्याची संधी मिळू शकते. हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, क्लिनिक्स आणि संशोधन संस्था यामध्ये या क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी सातत्याने वाढत आहे. एकूणच, कमी कालावधीत रोजगाराभिमुख कौशल्ये मिळवून स्थिर करिअर घडवायचे असेल, तर रेडिओलॉजीमधील डिप्लोमा हा एक स्मार्ट आणि फायदेशीर पर्याय ठरतो.

Web Title: Pursue a diploma in radiology what are the eligibility criteria

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 04:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.