Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईतील रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ‘NAAC’ चा ‘A’ ग्रेड !

खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने नॅकची 'ए' श्रेणी प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नॅकची समिती महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली व्यवस्था उत्तम शिक्षण पाहून पथक खूप प्रभावीत झाले आणि नवी मुंबईतील एक उत्तम महाविद्यालय म्हणून रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा उल्लेख केला.

  • By नारायण परब
Updated On: Sep 06, 2024 | 06:05 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद ( नॅक) बंगळूरकडून ए श्रेणी आणि ३.०४ सीजीपीएसह मानांकन प्राप्त करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.

नॅक तपासणी पथकाने नुकतीच महाविद्यालयाला भेट दिली या समितीमध्ये डॉ. शितिकांता मिश्रा (उपकुलगुरू शिक्षा अनुसंधान विद्यापीठ भुवनेश्वर ओडिसा) डॉ. राजशेखरन बालसुब्रमण्यम (निवृत्त प्राध्यापक व्यवसाय व व्यवस्थापन विभाग मनोमिलियन सुंदरम विद्यापीठ तामिळनाडू) डॉ. खुर्शिद अहमद खान ( प्राचार्य, इस्लामिया महाविद्यालय श्रीनगर जम्मू काश्मीर यांचा समावेश होता. नॅक तपासणी पथकाने महाविद्यालयाच्या प्रत्येक विद्या शाखेच्या विभागांना तसेच प्रशासकीय कार्यालय, परीक्षा कार्यालय, ग्रंथालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्ष, अध्ययन व अध्यापन विस्तार विभाग, जिमखाना इथे भेट देत संबंधित विभाग प्रमुखांशी संवाद साधला आणि महाविद्यालयाच्या कार्यप्रणालीचा अहवाल तयार केला, जो नॅक पोर्टलवर अपलोड करण्यात आला आहे.

३.०४ च्या सीजीपीएसह ‘ए’ श्रेणी प्रदान

नॅक समिती विविध सात निकषांच्या आधारे उच्च शैक्षणिक संस्थांचे मूल्यांकन आणि मान्यता प्रदान करते. मूल्यमापन निकषांमध्ये अभ्यासक्रमांचे पैलू अध्यापन, शिक्षण आणि मूल्यमापन, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिक्षण, संसाधने, विद्यार्थी समर्थन आणि प्रगती प्रशासन, आणि व्यवस्थापन, मूल्ये आणि सर्वोत्तम पद्धती या संदर्भात तपासणी पथकाने महाविद्यालयाच्या एकूण कामकाज व व्यवस्थापनाचे मूल्यांकन केले आणि ३.०४ च्या सीजीपीएसह ‘ए’ श्रेणी प्रदान केली. भेटी दरम्यान नॅक तपासणी पथकाने व्यवस्थापन सदस्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी पालक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थ्यासोबत बैठक घेतली तसेच तपासणी पथकाच्या सदस्यानी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा पुरवल्याबद्दल महाविद्यालयाची कौतुक केले.

नवी मुंबईतील एक उत्तम महाविद्यालय

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली व्यवस्था उत्तम शिक्षण पाहून पथक खूप प्रभावीत झाले आणि नवी मुंबईतील एक उत्तम महाविद्यालय म्हणून रामशेठ ठाकूर महाविद्यालयाचा उल्लेख केला. निष्कर्षात तपासणी पथकाने महाविद्यालयाच्या भविष्यातील प्रगतीसाठी आणि विकासासाठी सूचना दिलेल्या आदेश पथकाने दिलेल्या सूचनांच्या आधारे महाविद्यालयाने अतिरिक्त सुधारणा करण्यासाठी आणि पुढील नॅक प्रमाणक मानांकन व्यवस्थेमध्ये उच्च श्रेणी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या योजना आखल्या आहेत. नॅक मानांकन महाविद्यालयाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी आणि निर्धारित गुणवत्ता मानकांचे पालन करण्यासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नेतृत्वाखाली रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.

यासाठी संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगर पालिकेचे माजी सभागृहनेते व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य परेश ठाकूर महाविद्यालय, विकास समितीचे सदस्य प्रभाकर जोशी व दीपक शिंदे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे यांचे आदर्श नेतृत्व आणि शैक्षणिक प्रगती बद्दलची निष्ठा यांना विशेष श्रेय आहे. प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाच्या समन्वयक डॉ. माहेश्वरी झिरपे महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने ठरवलेल्या निर्धारित निकषांचे पालन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी समग्र शिक्षण आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले याविषयी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था व पालकवर्गाने महाविद्यालयाचे भरभरून कौतुक केले. भविष्यातही महाविद्यालयाची अशीच उच्च गुणवत्ता पूर्ण प्रगती राहील अशी ग्वाही सर्व सेवकांनी दिली.

Web Title: Ramsheth thakur college in navi mumbai a grade of naac

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक
1

मी विश्वास नांगरे पाटील बोलतोय…! नवी मुंबईत लोकप्रिय पोलीस अधिकाराच्या नावाने वृद्धेची 21 लाखांची फसवणूक

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद
2

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकाऱ्यांची बदली
3

Navi Mumbai News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकाऱ्यांची बदली

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा
4

Navi Mumbai : बेलापुर किनारी भागात शेड बांधकामाला अडथळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.