Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

नवी मुंबईतील उलवे येथे पोलिसांचा अजब कारभार पाहायला मिळत आहे. चोरीच्या घटनेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असतानाही, उलवे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवण्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ अशी तक्रार नोंदविण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 25, 2026 | 12:22 PM
उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

उलवे पोलिसांचा अजब कारभार! सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!

Follow Us
Follow Us:
  • उलवे पोलिसांचा अजब कारभार
  • सीसीटीव्हीत चोरी स्पष्ट, तरी गुन्ह्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ची नोंद!
  • तक्रार नोंदवून प्रकरणावर पडदा टाकल्याचा आरोप
सावन वैश्य | नवी मुंबई : ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’चा नारा देणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर उलवे परिसरात गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. उलवे सेक्टर २४ येथील साई लता इमारतीत घडलेल्या चोरीच्या घटनेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत असतानाही, उलवे पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवण्याऐवजी ‘मोबाईल गहाळ’ अशी तक्रार नोंदवून प्रकरणावर पडदा टाकल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सीसीटीव्हीत चोर दिसतात, तरी…

गुरुवारी (19 फेब्रुवारी) रात्री साई लता इमारतीतील सुरक्षारक्षक आपल्या कुटुंबासह खोलीत झोपलेला असताना, दोन अज्ञात चोरट्यांनी खोलीत प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोरटे अत्यंत शिताफीने सुरक्षारक्षकाचा मोबाईल फोन उचलून पसार होताना स्पष्टपणे दिसत आहेत. सकाळी मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर सीसीटीव्ही तपासणी केली असता चोरीची घटना उघडकीस आली.

दहावीचा पेपर लिहीत असतांना पोटात वेदना, अल्पवयीन विद्यार्थिनीने बाथरूममध्ये दिला बाळाला जन्म

पीडित सुरक्षारक्षक सीसीटीव्ही फुटेजसह उलवे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. मात्र, पोलिसांनी फुटेज पाहण्याचीही तसदी घेतली नाही. उलट, ‘मोबाईल सेक्टर २४ परिसरात कुठेतरी पडून गहाळ झाला असावा’ अशी नोंद करून त्याच्या हातावर ‘मोबाईल गहाळ’ची तक्रार देण्यात आली. चोरीचा स्पष्ट पुरावा असूनही गुन्हा नोंदवला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

चोरीचे गुन्हे ‘मिसिंग’मध्ये ढकलले जातात का?

ही एकमेव घटना नसून, नवी मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या घटनांची नोंद ‘मोबाईल गहाळ’ किंवा ‘प्रॉपर्टी लॉस’ या सदराखाली केली जात असल्याचे वारंवार समोर येत आहे. चोरीचा गुन्हा दाखल न करता ‘गहाळ’ म्हणून नोंद केल्यास तपासाची जबाबदारी कमी होते आणि गुन्हेगारीचे आकडेही कमी दाखवता येतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

उलवे परिसरात मोबाईल चोरी, रिक्षा, चारचाकी वाहनांमधील साहित्य चोरी, वाहनांचे सुटे भाग (नट-बोल्ट, बॅटरी इत्यादी) चोरीच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र अनेकदा तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना गुन्हा नोंदवण्याऐवजी ‘मिसिंग’ किंवा ‘प्रॉपर्टी लॉस’ म्हणून नोंद करून घरी पाठवले जाते, असा आरोप आहे.

गरीब कामगारांवर दुहेरी मार

परराज्यातून रोजगारासाठी नवी मुंबईत आलेल्या कामगारांसाठी मोबाईल हा केवळ संवादाचे साधन नसून त्यांच्या कष्टाची कमाई आणि कुटुंबाशी संपर्काचे एकमेव माध्यम असते. अशा परिस्थितीत मोबाईल चोरीला गेल्यावरही पोलिसांकडून गंभीर दखल घेतली जात नसल्यामुळे या कामगारांवर दुहेरी अन्याय होत आहे.

गुन्हेगारी वाढतेय, पोलिसांची भूमिका संशयास्पद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी वेगाने विकसित होणारा उलवे नोड आता गुन्हेगारीच्या घटनांसाठी चर्चेत येऊ लागला आहे. चोरी, वाहनफोड, मोबाईल लंपास, रिक्षा व चारचाकी वाहनांमधून साहित्य चोरी अशा घटना सातत्याने घडत आहेत. मात्र, गुन्हेगारीचे अधिकृत आकडे कमी दाखवण्यासाठी पोलिसांकडून चोरीच्या घटनांना ‘गहाळ’ म्हणून नोंदवले जात आहे का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका काय?

या संपूर्ण प्रकरणावर पोलीस वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात? सीसीटीव्ही पुरावा असूनही चोरीचा गुन्हा नोंदवला जाणार का? उलवे परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर ठोस कारवाई होणार का? की नागरिकांना अशाच प्रकारे न्यायासाठी दरवाजे ठोठावावे लागणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हॉटेल बिलावरून झाला राडा; एकावर कुऱ्हाडसह लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला

 

Web Title: Bizarre behavior of ulwe police theft clearly caught on cctv yet instead of filing a case they recorded it as mobile missing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 12:22 PM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • police

संबंधित बातम्या

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा
1

Malegaon rape case: आधी बलात्कार, नंतर डोकं ठेचून…; मालेगाव अत्याचार-हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर, आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप
2

Mira Road News: वाहतूक पोलीस चौकी हटवली, मग इतर अतिक्रमणांचे काय? मराठी एकीकरण समितीचा सवाल; कारवाईवरून संताप

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत
3

Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलीस दलात मोठ्या खांदेपालटाचे संकेत! ११ वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीपी पदोन्नतीच्या निवडसूचीत

Navi Mumabi News: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे? पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्न
4

Navi Mumabi News: नवी मुंबईत नवरात्रोत्सवाच्या मंडपांमध्ये जुगाराचे अड्डे? पोलिसांच्या कारवाईवर नागरिकांचे प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.