फोटो सौजन्य - Social Media
CDAC मध्ये विविध पदांसाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. जर तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. मुळात, डिझाईन इंजिनियर पदासाठी कार्य करण्यास इच्छुक असाल तर या भरतीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. डिझाईन इंजिनियर तसेच सीनियर डिझाईन इंजिनियर या पदांसाठी रिक्त असणाऱ्या जागांना भरण्यासाठी या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून 280 उमेदवार नियुक्त होऊ शकतात. जरी शेवटची तारीख 31 जुलै 2025 निश्चित करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर फार विलंब न करता या भरतीसाठी अर्ज करण्यात यावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहे त्यामुळे अर्ज कर्त्यांनी सीडी एसीच्या cdac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
या भरती संदर्भात अधिकृत आणि सूचना जाहीर करण्यात आली आहे. तिचा आढावा घेण्यासाठी उमेदवारांनी त्याच अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यापूर्वी त्या अधिसूचनेचा संपूर्ण रित्या आढावा घ्यावा तसेच अभ्यास करावा मगच पुढील प्रक्रियेला सुरुवात करावी. त्याच सह टेक्निकल मॅनेजर तसेच सीनियर टेक्निकल मॅनेजर पदासाठी उमेदवारा अर्ज करू शकतात. अर्ज करत्या उमेदवारांना काही शैक्षणिक निकषांना पात्र करावे लागणार आहे. बीई किंवा बी टेक झालेले उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. अर्ज करता उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्ज अगदी निशुल्क करता येणार आहे.
काही निश्चित वय असलेल्या उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. वयोमर्यादा पदांनुसार वेगवेगळी आहे. ती जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेला अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
अशाप्रकारे करता येईल अर्ज:
त्या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेला अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. तसेच तेथे देण्यात आलेल्या संपर्क स्थलांवर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता.