५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत कांद्याची चटणी
जेवण बनवण्यासाठी लागणारा प्रमुख पदार्थ म्हणजे कांदा. कोणतीही भाजी, आमटी, डाळ किंवा इतर नाश्त्यातील पदार्थ बनवताना कांद्याचा वापर केला जातो. बऱ्याचदा सकाळच्या डब्यासाठी किंवा जेवणात नेमकी काय भाजी बनवावी? हे सुचत नाही. नेहमीच भेंडी, गवार किंवा कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही ५ मिनिटांमध्ये झटपट कांद्याची चटणी बनवू शकता. कांद्याचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कारण कांदा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि पौष्टिक आहे. कांद्याच्या सेवनामुळे केसांसंबधित समस्यांपासून सुटका मिळते. केस गळती थांबून केस अतिशय चमकदार आणि मजबूत होतात. सर्वच लहान मुलांना चवीला तिखट असलेला कांदा ख्याल आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना कांद्याची चटणी किंवा इतर पदार्थ बनवून खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
सकाळचा नाश्ता करा हटके; घरी बनवा खमंग दुधीचे थालीपीठ, झटपट तयार होते रेसिपी
संध्याकाळचा नाश्ता थोडा चिजी होऊन जाऊद्यात; घरी बनवा सर्वांच्या आवडीचा Mac And Cheese