फोटो सौजन्य - Social Media
एअरपोर्ट्स ऍथॉरिटी ऑफ इंडिया (AAI)ने अधिसूचना जाहीर केली आहे. तसेच लवकरच भरतीला सुरुवात होणार आहे. फायर विभागात या भरतीला सुरुवात करण्यात येणार आहे. ज्युनिअर असिस्टंटच्या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली असून या संदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे. मुळात, या भरतीसाठी अर्ज करण्याची विंडो अद्याप खुली करण्यात आली नाही आहे. उमेदवारांना ३० डिसेंबर २०२४ पासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच २८ जानेवारी २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करायचे आहे. एकूण ८९ रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीच्या प्रक्रियेसाठी सहभाग घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांना परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. या परीक्षेला उत्तीर्ण करत तसेच काही नियुक्तीच्या टप्प्यांना सामोरे जात उमेदवाराला नियुक्तीस पात्र होता येणार आहे. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर नाही. उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. काही आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. एकंदरीत, SC/ ST/ Ex-Servicemen/ Women प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये अर्ज शुल्क भरायचा आहे. तसेच OBC आणि EWS या आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये अर्ज शुल्क भरायचा आहे.
अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र होण्यासाठी काही अटी शर्तीना पात्र असणे अनिवार्य आहे. अन्यथा, उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. अर्ज करण्यास उमेदवार एक दहावी उत्तीर्ण + Mechanical/ Automobile/ Fire Engineering क्षेत्रात डिप्लोमा धारक हवा किंवा उमेदवाराने HSC उत्तीर्ण केली असावी. तसेच उमेदवाराकडे हेवी वेहिकल ड्राइविंग लायसेन्स असणे आवश्यक आहे किंवा मिडीयम वेहिकल ड्राइविंग लायसेन्स किमान एक वर्ष जुना असणे आवश्यक आहे. तसेच २ वर्ष जुना लाईट वेहिकल ड्राइविंग लायसेन्स असणारे उमेदवारही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादे संदर्भात नमूद अटी शर्तीनुसार, किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी वयोमायदेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येणार अर्ज
1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: aai.aero
2. वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरसह नोंदणी करा.
3. ऑनलाइन अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
4. अर्ज शुल्क ऑनलाइन भरावे.
5. अर्ज २८ जानेवारी २०२५ पूर्वी सबमिट करा.