फोटो सौजन्य - Social Media
पंजाब नॅशनल बँकेने (PNB) 2024 मध्ये साइकोलॉजिस्ट आणि महिला साइकोलॉजिस्ट पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होऊन 16 डिसेंबर 2024 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात. जे उमेदवार पंजाब नॅशनल बँकेत काम करण्याची इच्छा बाळगतात आणि या पदांवरील आवश्यक पात्रता पूर्ण करतात, त्यांना या संधीचा लाभ घेता येईल. या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जहीर करण्यात आली आहे.
पंजाब नॅशनल बँकेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी अधिकतम वयोमर्यादा 69 वर्ष आहे. कारण, पॅनलमध्ये समाविष्ट असलेल्या साइकोलॉजिस्टसाठी अधिकतम वयोमर्यादा 70 वर्षे ठेवण्यात आली आहे. या वयोमर्यादे संदर्भात काही अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. तसेच अर्ज कर्त्या उमेदवारांना काही शैक्षणिक अटी शर्तीचे पालन करावे लागणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त संस्थेतून साइकोलॉजिस्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट (M.A.) डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय, पीएचडी किंवा एम.फिल डिग्री असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. काउन्सलिंग थेरपीमध्ये विशेषतः CBT (कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी) मध्ये प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना अधिक महत्त्व दिले जाईल. या क्षेत्रात किमान 10 वर्षांचा अनुभव असावा लागेल.
ज्याला या पदासाठी निवडले जाईल, त्यांना प्रत्येक महिन्यात ₹1,00,000 इतका वेतन मिळेल. हे एक एकत्रित वेतन असेल, ज्यामध्ये कोणत्याही अतिरिक्त भत्त्यांचा समावेश नसेल. पंजाब नॅशनल बँकेच्या या पदांसाठी उमेदवारांची निवड अर्जाच्या शॉर्टलिस्टिंग आणि पर्सनल इंटरव्ह्यूसाठी केली जाईल. मुलाखतीत उमेदवारांची तांत्रिक आणि व्यावसायिक क्षमता तपासली जाईल. या नियुक्तीच्या प्रक्रियेत पात्र उमेदवार या भरतीसाठी पात्र होतील.
उमेदवारांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन अर्ज भरावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2024 आहे, त्यामुळे अर्ज लवकर सादर करणे आवश्यक आहे. पंजाब नॅशनल बँकेतील साइकोलॉजिस्ट आणि महिला साइकोलॉजिस्ट पदासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज करावा आणि या संधीचा लाभ घ्या. या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी त्या अधिसूचनेचा सखोल अभ्यास करावा. त्यातील बाबी समजून घेऊन अर्ज करण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यात यावा.