फोटो सौजन्य - Social Media
HDFC बँकेमध्ये भातील सुरुवात झाली आहे. वर्षाच्या शेवटी या भरतीला आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये भरती करू पाहणार्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. एकंदरीत, रिलेशनशिप मॅनेजरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभरात या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी hdfcbank.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्जाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापले अर्ज नोंदवले आहे.
HDFC ने या भरतीसाठी अर्ज नोंदवण्याची विंडो ३० डिसेंबर २०२४ पासून खुली केली आहे. तर उमेदवारांना ७ फेब्रुवारी २०२५ या तारखेपर्यंत या भरतीसाठी आपल्या अर्जास नोंदवता येणार आहे. तसेच अर्ज कर्त्या उमेदवारांना नियुक्तीस पात्र होण्यासाठी ऑनलाईन टेस्ट पात्र करावी लागणार आहे. या परीक्षेचे आयोजन मार्च २०२५ मध्ये करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. सर्व प्रवर्गांसाठी एक रक्कम निश्चित करण्यात आली आहे. एकंदरीत, अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ४७९ रुपयांची रक्कम भरावी लागणार आहे. यामध्ये GST चा समावेशदेखील आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना काही बाबी लक्षात घेणे महत्वाचे आहे. उमेदवारांना काही पात्रता निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत, तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किमान ५०% गुणांनी उत्तीर्ण आणि पदवीधर असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवाराला १०वी आणि १२वी किमान ५०% उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच अर्ज कर्त्या उमेदवाराकडे १ वर्षे ते १० वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. अनुभव सेल्स क्षेत्रातील हवे.
तीन टप्प्यांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवाराला ऑनलाईन टेस्ट उत्तीर्ण करावी लागणार आहे. इंग्रजी भाषेमध्ये या भरतीचे परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांना हजार राहावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय चाचणी आणि दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी उमेदवाराना उपस्थित राहावे लागणार आहे. अधिसूचनेमध्ये उमेदवाराला त्याच्या अनुभवानुसार वेतन दिला जाईल. वार्षिक वेतन ३ लाख रुपये ते १२ लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.