फोटो सौजन्य - Social Media
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड ( MMRCL )ने भरतीला सुरुवात केली आहे. उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर तसेच ज्युनिअर मॅनेजरच्या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन करायचे आहे. उमेदवारांना अर्ज mmrcl.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करता येणार आहे. या पदांसाठी उमेदवारांना २८ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या एका महिन्याच्या कालावधीत उमेदवारांना अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. यानंतर ऍप्लिकेशन विंडो बंद करण्यात येईल, त्यामुळे उमेदवारांना अर्ज करता येणार नाही. दिलेल्या मुदतीला लक्षात घेऊन इच्छुक उमेदवारांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी.
एकूण ७ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. सिव्हिल विभागात या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. असिस्टेंट जनरल मॅनेजरच्या १ रिक्त पदासाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या रिक्त जागांमध्ये डेप्युटीच्या इंजिनिअरची ५ रिक्त जागांचा आणि ज्युनिअर इंजिनिअर II च्या १ रिक्त जागेचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करणे आवश्यक आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत.
अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक अटीनुसार, असिस्टेंट जनरल मॅनेजर आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून फुल टाइम सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केली असावी. त्याच्या डिग्रीचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे असावे. तसेच ज्युनिअर असिस्टंट्च्या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री किंवा डिप्लोमाधारक असावे. तसेच अर्ज करता उमेदवाराकडे अनुभव असणे अनिवार्य आहे. अधिसूचनेमध्ये नमूद वयोमायदे संदर्भात असणाऱ्या अटीनुसार, जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच अधिसूचनेमध्ये नियुक्त उमेदवाराला मिळणाऱ्या वेतनाबाबत माहिती पुरवण्यात आली आहे.
अधिसूचनेनुसार, नियुक्त उमेदवाराला ३५,२८० रुपये ते २,००,०००/- इतके दरमाह वेतन मिळण्याची शक्यता आहे. मुळात, या भरतीमध्ये नियुक्तीसाठी भली मोठी प्रक्रिया नाही आहे. उमेदवारांना फक्त मुलाखतीला यावे लागणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या परीक्षेचा समावेश नाही आहे. ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जात आहे. या भरतीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज केला आहे. तसेच अनेक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत. जर तुम्हीदेखील या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर नक्कीच जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा आणि अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी.