फोटो सौजन्य - Social Media
एम्प्लॉयीस स्टेट इन्शुरन्स कंपनी (ESIC)मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इन्शुरन्स मेडिकल ऑफिसर ग्रेड-II च्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण ६०८ रिक्त जागांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरती संबंधित सखोल माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये जाहीर करण्यात आली आहे. संपूर्ण भारतभरातून उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ESCI च्या esic.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती संदर्भात सखोल माहिती :
उमेदवारांना आजपासून अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, १९ डिसेंबर २०२४ पासून उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तर ३१ जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत अर्जाची विंडो खुली ठेवण्यात येणार आहे. काही ठराविक आरक्षित वर्गांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या भरतीच्या माध्यमातून एकूण ६०८ जागांचा विचार केला जाणार आहे. यामध्ये २५४ जागा सामान्य श्रेणीसाठी राखीव आहेत. ६३ जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. ५३ जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. १७८ जागा OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. ६० जागा EWS प्रवर्गासाठी, २८ जागा PwBD (C) तसेच ६२ जागा PwBD (D & E) या प्रवर्गासाठी राखीव आहेत.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही विशिष्ट अटी आणि शर्ती पूर्ण करणे अनिवार्य आहे. या अटी आणि शर्ती मुख्यतः उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात तसेच वयोमर्यादेबाबत लागू आहेत. त्यामुळे अर्जदारांनी या अटींची तपशीलवार माहिती घेतल्याशिवाय अर्ज करणे टाळावे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला MBBS अर्थात वैद्यकीय पदवीधर असणे गरजेचे आहे. म्हणजेच, उमेदवाराने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि त्याला त्याचा अधिकृत पदवी प्रमाणपत्र मिळालेले असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराने किमान प्रशिक्षणार्थी (इंटर्नशिप) म्हणून ठराविक कालावधीसाठी काम केलेले असावे. इंटर्नशिपचा अनुभव उमेदवारांच्या व्यावसायिक कौशल्यांवर प्रकाश टाकतो आणि त्याला भरती प्रक्रियेत प्राधान्य दिले जाते.अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु निश्चित करण्यात आली आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. उमेदवारांची नियुक्ती CMSE २०२२ आणि २०२३ च्या मेरिटवर आधारित केली जाणार आहे.
अशा प्रकार करता येईल अर्ज