मुंबई विद्यापीठाअंतर्गत मोठी भरती; प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांच्या 152 जागा भरल्या जाणार!
मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / उपग्रंथपाल, सहायक प्राध्यापक / सहायक ग्रंथपाल पदांच्या एकूण 152 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 असणार आहे.
संस्था : मुंबई विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद :
1. विद्याशाखांचे अधिष्ठाता – 04 रिक्त जागा
2. प्राध्यापक – 21 रिक्त जागा
3. सहयोगी प्राध्यापक/उपग्रंथपाल – 54 रिक्त जागा
4. सहायक प्राध्यापक/सहायक ग्रंथपाल – 73
एकूण रिक्त पद संख्या : 152 पदे
नोकरीचे ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 ऑगस्ट 2024 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत)
कसा कराल अर्ज
– मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
– उमेदवारांनी दिलेल्या मुदतीअगोदर अर्ज सादर करावेत.
– उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जवर नाहीत.
– अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 07 ऑगस्ट 2024 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत) असणार आहे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा : https://mu.ac.in/wp-content/uploads/2024/07/ADV-T0-8.07.2024.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : https://muappointment-adhoc.mu.ac.in/
अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ https://mu.ac.in/ ला भेट द्या.