Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय वायुदलात भरतीच्या संधी! ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात

भारतीय वायुदलामध्ये भरतीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उमेदवारांना जुलैच्या ११ तारखेपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अर्ज करा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2025 | 04:01 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतीय वायूदलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘अग्निपथ योजना’ अंतर्गत अग्निवीर वायू इंटेक 1/2026 साठी भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली असून ११ जुलै २०२५ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळ agnipathvayu.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. याअंतर्गत २५ सप्टेंबर २०२५ रोजी ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

HVF ने केले भरतीचे आयोजन! ‘या’ तारखेपासून करता येईल अर्ज

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १ जानेवारी २००५ ते १ जानेवारी २००८ दरम्यान असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचे किमान वय १७.५ वर्षे, तर कमाल वय २१ वर्षे असावे. काही विशेष प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, अर्जदारांनी १२वी उत्तीर्ण असावे आणि भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये किमान ५० टक्के गुण मिळवलेले असावेत. याशिवाय, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कंप्युटर सायन्स यासारख्या ट्रेडमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा घेतलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांच्याकडेही ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. दोन वर्षांचा व्होकेशनल कोर्स पूर्ण केलेले उमेदवारही पात्र आहेत, मात्र त्यामध्ये फिजिक्स, मॅथ्स व इंग्रजीत ५० टक्के गुण आवश्यक आहेत.

अग्निवीर वायू भरती प्रक्रिया चार टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाईल, त्यानंतर फिजिकल फिटनेस टेस्ट (PST/PET), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल. या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम मेरिट लिस्ट तयार केली जाईल. पगाराच्या बाबतीत, अग्निवीर वायूला पहिल्या वर्षी ३०,००० रुपये प्रति महिना पगार मिळेल. हा पगार दरवर्षी वाढून चौथ्या वर्षी ४०,००० रुपये प्रति महिना होईल. सेवा पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना सुमारे १०.०८ लाख रुपये ‘सेवा निधी’ करमुक्त स्वरूपात दिली जाईल.

११०० पदांसाठी मास्टर भरती! DMER ने केले आयोजन; इच्छुक आहात? मग करा Apply

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर जावे. “New Registration” वर क्लिक करून नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून आवश्यक माहिती भरावी, कागदपत्रे अपलोड करावी, अर्ज फी भरावी आणि अर्ज सबमिट करावा. अर्जाचा प्रिंटआउट भविष्यासाठी जतन करून ठेवावा.

Web Title: Recruitment opportunities in indian air force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • air force
  • Recruitment News

संबंधित बातम्या

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी
1

ISRO Recruitment 2026: इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती सुरू; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी

UPSC Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू
2

UPSC Recruitment 2026: नोकरीची सुवर्णसंधी! संघ लोक सेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये थेट भरती सुरू

Indian Air Force Job: भारतीय वायुसेनेत मल्टी-टास्किंग स्टाफ पदांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत
3

Indian Air Force Job: भारतीय वायुसेनेत मल्टी-टास्किंग स्टाफ पदांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.