फोटो सौजन्य - Social Media
एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑरगॅनिझशन (EPFO)मध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. पदवीधर असलेल्या युवकांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. युथ प्रोफेशनलच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या लिखित परीक्षेची गरज नाही. उमेदवारांना कोणत्याही लिखित परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार नाही आहे. उमेदवारांना दरमाह वेतन ६५,००० रुपये पुरवण्यात येईल. मुळात, ही भरतीची प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. उमेदवारांना ओनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज कारण्यागोदर उमेदवारांनी या भरतीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
हे देखील वाचा : फक्त IIT च नव्हे तर ‘या’ ५ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर असते Google चे लक्ष
या भरतीसाठी अर्ज करण्या अगोदर उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र कर्वे लागणार आहे. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणा संदर्भात आहेत. तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भर्तीसाठी अर्ज करता येणार आहे. शैक्षणिक अटीनुसार, या भरतीसाठी अर्ज करू पाहणारा उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीधर हवा. तसेच जर उमेदवाराकडं कामाचे अनुभव असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. या भरतीसाठी विशेषतः तरुणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे वय जास्तीत जास्त ३२ वर्षे असणे निश्चित करण्यात आले आहे. त्याहून जास्त आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही.
या भरतीसाठी उमेदवारांची नियुक्ती प्रॅक्टिकलच्या आधारे केली जाणार आहे. यामध्ये कोणत्याही परीक्षेचा समावेश नाही. नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रॅक्टिकल पात्र करावे लागणार आहे. यावेळी येताना उमेदवारांना त्यांचे दस्तऐवज सादर करावे लागणार आहेत. लिखित परीक्षा नसल्याने ही भरती अगदी सोपी बनली आहे. उमेदवारांना अगदी सरळ पद्धतीने या भरतीसाठी नियुक्त होता येत आहे.
हे देखील वाचा : स्टार्ट अप सुरु करण्याचा विचार करताय? ‘हे’ व्यवसाय मिळवून देतील उत्तम नफा
उमेदवारांनी सर्वप्रथम EPFO च्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. epfindia.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ आहे. येथे असलेल्या अधिसूचनेत एक फॉर्म आहे, तो भरून घ्यावा. त्याची एखादी प्रत स्वतःकडे काढून घावी तर आणखीन एखादी प्रत इमेलच्या माध्यमातून rpfc.exam@epfindia.gov.in जमा करावी. यावेळी आवश्यक त्या दस्तऐवजांची पूर्तता करावी. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.