इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) भारतातील अग्रगण्य अभियंत्रितकी संस्था आहे. या संस्थानात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात. अनेक जण IIT मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मुळात, अभिनयांत्रिकी क्षेत्रामध्ये IIT मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पहिले प्राधान्य दिले जाते. Google सारख्या मोठ्या कंपन्या IIT मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देत असते. देशात अशा काही आणखीन संस्था आहेत, ज्यावर Google नेहमी लक्ष ठेवून असतो.
फोटो सौजन्य - Social Media

अण्णा युनिव्हर्सिटी चेन्नईमध्ये स्थित आहे. हे सार्वजानिक राज्य विद्यापीठ आहे. अभियांत्रिकी तसेच तांत्रिकी क्षेत्रातील उत्तम शिक्षणासाठी अण्णा युनिव्हर्सिटी ज्ञात आहे.

वेल्लोर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी व्यावहारिक शिक्षणावर भर देण्यासाठी ज्ञात आहे. अभियांत्रिकी शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या महाविद्यालयावर गूगलची नेहमी नजर असते.

दिल्ली मध्ये स्थित असलेली दिल्ली टेक्नॉलॉजी यूनिवर्सिटी भारतामध्ये नावाजलेली आहे. ही युनिव्हर्सिटी गूगलमध्ये प्लेसमेंटसाठी प्राधान्य देते.

त्रिची येथे स्थित असलेले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये भविष्य घडवू इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक पुढारीची संस्था आहे.

बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी या विद्यापीठातून Google नेहमीच विद्यार्थी पाहत असते. येथील अनेक विद्यार्थी Google मध्ये मोठ्या पदावर आहेत.






