फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ( NHAI )मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. मॅनेजरच्या पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. ६ डिसेंबरपासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायची आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी nhai.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना जानेवारीच्या ६ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. ही भरती डेप्युटेशन स्वरूपात केली जाईल. अर्जाचा फ्रॉम प्रिंट आउट करण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी निश्चित करण्यात आली आहे. अर्ज करण्याऱ्या इच्छुक उमेदवारांनी या अंतिम तारखांचा आढावा घ्यावा. शेवटची तारीख निघून गेल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच उमेदवारांना अर्ज प्रिंट करताही येणार नाही.
तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही शैक्षणिक अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून कॉमर्सची बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराने अकाउंटंट किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर केलेले असणे अनिवार्य आहे. तसचे उमेदवाराला संबंधित क्षेत्रात किमान चार वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. एकूण १७ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे जास्तीत जास्त वय ५६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. लेव्हल ११ च्यानुसार, नियुक्त उमेदवारांचे दरमाह वेतन ६७,००० रुपये ते ०२,०८,७०० रुपये आहे. नियुक्तीच्या प्रक्रियेत मुलाखतीचा समावेश आहे. एकंदरीत, या भरतीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांना मुलाखतीला पात्र करावे लागणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज
ऑफलाईन अर्ज ‘या’ पत्त्यावर पाठवू शकता
DGM(HR/ADMN.)-III, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्लॉट क्रमांक जी ५ – ६, सेक्टर – १०, द्वारका, नवी दिल्ली – ११००७५.
या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना त्या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी तसेच या भरतीबाबत सखोल अभ्यासासाठी उमेदवारांनी नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ( NHAI ) च्या या जाहिरातीचा आढावा घ्यावा.