Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC मध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात; विविध पदांसाठी करता येणार अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 22, 2025 | 03:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. ही भरती कॉम्प्रिहेन्सिव्ह थॅलॅसेमिया केअर, बालरोग रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो ट्रान्सप्लान्टेशन केंद्र बोरिवली येथे होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी असून, वैद्यकीय सल्लागार, कनिष्ठ सल्लागार (बालरोग), सहाय्यक अधिकारी, त्वचारोग तज्ञ, नर्स, कनिष्ठ औषध निर्माण अधिकारी, रिसेप्शनिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर अशा विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

आगामी काळात विमाः विमा क्षेत्रात करिअर आणि नोकरीच्या संधीतील होणारे बदल, जाणून घ्या.. 

प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय संक्रमण सल्लागार आणि कनिष्ठ सल्लागार (बालरोग) पदासाठी MD/DNB किंवा समतुल्य पदवी आवश्यक आहे, तर अतिदक्षता बालरोग तज्ञ पदासाठी MBBS पूर्ण असणे गरजेचे आहे. सहाय्यक अधिकारी पदासाठी संबंधित क्षेत्रातील अनुभव असावा, तर नर्स पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेतून नर्सिंगचे शिक्षण आवश्यक आहे. कनिष्ठ औषध निर्माण अधिकारी पदासाठी औषधनिर्माण विषयातील पदवी अनिवार्य आहे. रिसेप्शनिस्ट आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी संगणक कौशल्य आणि संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे.

उमेदवारांना अर्ज ऑनलाइन स्वरूपात सादर करावा लागेल. www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १ एप्रिल २०२५ आहे. अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. BMC द्वारे जाहिरातीमध्ये विविध पदांसाठी वेगवेगळी वेतनश्रेणी निश्चित करण्यात आली आहे. वैद्यकीय सल्लागार पदासाठी ₹२,१६,०००/- प्रति महिना, कनिष्ठ सल्लागार पदासाठी ₹१,५०,०००/- प्रति महिना, तर सहाय्यक अधिकारी पदासाठी ₹९०,०००/- प्रति महिना वेतन निश्चित करण्यात आले आहे. इतर पदांसाठी वेतन पदानुसार दिले जाणार आहे.

भारतीय नौदल SSR आणि MR भरती 2025; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

उमेदवारांनी अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करावीत. अर्जाची अंतिम तारीख लक्षात घेऊन वेळेत अर्ज करावा आणि भरती प्रक्रियेसाठी BMC च्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अपडेट पाहावेत. ही सुवर्णसंधी असून, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. १ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारांनी लवकर याबाबत निर्णय घेऊन अर्ज करण्यास सुरुवात करावी.

Web Title: Recruitment process begins in bmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • BMC

संबंधित बातम्या

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक
1

BMC आयुक्त अश्विनी भिडें यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट नाकारल्याचा दावा; आयुक्तांच्या भूमिकेवर वंचित आक्रमक

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती
2

BMC News: उत्सव मंडपांवर आता प्रशासनाची करडी नजर; उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार BMC कडून तपासणी समिती

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’
3

मुंबईची मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात; फडणवीस सरकारला दाखवलं ‘रेड कार्ड’

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ
4

Mumbai Politics: एसआरएमुळे पालिकेचा कोट्यवधींचा महसूल बुडाला; अश्विनी भिडेंच्या पत्राने मंत्रालयात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.