फोटो सौजन्य - Social Media
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल (AIIMS)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. नॉन फॅकल्टी ग्रुप B आणि C पदांसाठी ही भरती सुरु करण्यात आली आहे. २५ ऑगस्टपासून ते २६ ऑगस्टपर्यंत ही भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती टेक्निशियन पदासाठी तसेच असिस्टेंट, क्लर्क, लैब अटेंडेंट, डेटा एंट्री ऑपरेटर, असिस्टेंट इंजिनियर, लाइनमैन, ड्राफ्ट्समैन ग्रेड-III फार्मासिस्ट या पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून २३०० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
१२ जुलैपासून या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. तसेच ३१ जुलैपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी निश्चित करण्यात आलेले पात्रता निकष पाहिले तर दहावी आणि बारावी पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात पदवीधर असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाहीत. PG झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त ३५ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज कर्त्या उमेदवारांना आरक्षित प्रवर्गामुळे काही वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. SC / ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ५ वर्षांची सूट देण्यात येणार आहे. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर PWBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक १० वर्षांची सूट देण्यात आली आहे.
नियुक्तीच्या प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश आहे. यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षा पात्र करावी लागणार आहे. तसेच उमेदवारांची कौशल्याची चाचणी घेण्यात आली आहे. सामान्य आणि OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ३००० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहे. SC तसेच ST, EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २४०० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरायचे आहे.
अशा प्रकारे असेल परीक्षेचा पॅटर्न:
परीक्षेमध्ये जनरल नॉलेज एंड एप्टीट्यूड तसेच नॉलेज ऑफ कंप्यूटर या दोन विषयांचा अभ्यास करता येईल. यामध्ये प्रश्नांची संख्या १०० असणार आहे. तसेच गुणसंख्या ४०० निश्चित करण्यात आले आहे. वेळ ९० मिनिटांची निश्चित करण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: