फोटो सौजन्य - Social Media
बॉर्डर रोड ऑर्गनाइजेशन (BRO)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास उत्सुक आहात तर आजच अर्ज करा, कारण आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना २४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. मुळात, या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात सखोल माहिती पुरवण्यात येणार आहे. या भरतीबाबत आणखीन एखादी महत्वाची बाब अशी आहे की अर्ज ऑफलाईन स्वरूपात भरायचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती संदर्भात महत्वाची माहितीसंदर्भात:
या भरतीसंदर्भात आकर्षणाची बाब म्हणजे उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. सर्व उमेदवारांना अगदी मोफत आणि निशुल्क अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. फक्त उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करूनच अर्ज करता येणार आहे. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर या भरतीसाठी जातीत जास्त आयु २५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आली आहे.
अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या निकषांनुसार उमेदवारांना किमान दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. जर तुम्ही दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण आहात तर तुम्ही आजच्या आज या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात करावी. या भरतीसाठी उमेदवारांना नियुक्तीच्या प्रक्रियेला पात्र करावे लागणार आहे, तरच नियुक्तीस पात्र होता येणार आहे. उमेदवारांना लिखित परीक्षा पात्र करत कौशल्य चाचणीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. या दोन्ही टप्प्यांना पात्र उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी जाहीर नोटिफिकेशन डाउनलोड करावे. तेथे अर्जाचा फॉर्म पुरवण्यात आला आहे. त्याची प्रत घेऊन आवश्यक महत्वाचा तो तपशील भरून घ्यावा. तसेच अधिसूचनेमध्ये पुरवण्यात आलेल्या पत्त्यावर भरलेला फॉर्म पाठवून द्या. जर तुम्ही इच्छुक असाल तर हा फॉर्म आजच पाठवण्यात आला पाहिजे. कारण मुदतीनंतर पाठवण्यात आलेले फॉर्म स्वीकारण्यात येणार नाहीत. याची दखल इच्छुक उमेदवारांनी घेण्यात यावी.