फोटो सौैजन्य - Social Media
कायदा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. देशातील नामांकित नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLUs) कडून घेतली जाणारी कॉमन लॉ अॅडमिशन टेस्ट (CLAT) 2026 साठी नोंदणी प्रक्रिया 1 ऑगस्ट 2025 पासून अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. ही परीक्षा CLAT UG (पाच वर्षांचा एकत्रित LLB कोर्स) आणि CLAT PG (LLM कोर्स) साठी घेतली जाते.
जे विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेऊन वकील, न्यायाधीश किंवा लॉ क्षेत्रातील इतर पदांवर काम करण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट consortiumofnlus.ac.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर ईमेल, मोबाईल नंबरद्वारे खाते तयार करून वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरावी लागेल. त्यासोबतच आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा लागेल.
CLAT 2026 मध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सुरुवात वेळेत करणे आवश्यक आहे. चांगली तयारी, योग्य मार्गदर्शन आणि नियोजनाद्वारे तुम्ही तुमचे लॉ करिअर घडवू शकता.
नोंदणीला सुरुवात झाली आहे. वेळ वाया घालवू नका, आजच अर्ज भरा!
दिल्लीमध्ये असलेले बेस्ट कॉलेज
हे कॉलेजेस लॉ (कायदा) क्षेत्रात देशातील सर्वोत्तम मानले जातात. येथे प्रवेशासाठी CLAT, AILET यांसारख्या स्पर्धा परीक्षांची आवश्यकता असते.