फोटो सौैजन्य - Social Media
मध्य प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (MPTRANSCO) कडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रियेची घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी असून, 4 ऑगस्ट 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. जे उमेदवार अद्याप अर्ज करू शकलेले नाहीत, त्यांनी अधिक वेळ न दवडता अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला अर्ज दाखल करावा.
या भरती मोहिमेअंतर्गत सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, लाइन अटेंडंट, सबस्टेशन अटेंडंट यासह विविध पदांवर एकूण 633 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
पात्रता निकष काय आहेत?
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा किंवा पदवी (Degree) असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी अभियांत्रिकी, कायदा किंवा तांत्रिक विषयात शिक्षण घेतलेले उमेदवार प्राधान्याने पात्र ठरतात. सविस्तर पात्रतेसाठी अधिकृत अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला जातो.
वयोमर्यादा आणि सवलती:
उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमानुसार वयात सूट मिळू शकते.
पगार आणि भत्ते:
निवड झाल्यानंतर उमेदवारांना पदानुसार ₹19,500 ते ₹62,000 दरम्यान वेतन मिळेल. या वेतनात शासनमान्य भत्ते व इतर लाभ समाविष्ट असतील.
निवड कशी होणार?
उमेदवारांची निवड 100 गुणांच्या संगणक आधारित परीक्षेद्वारे (CBT) केली जाणार आहे. या परीक्षेत सर्व प्रश्न MCQ प्रकाराचे असतील. यामध्ये पात्र होण्यासाठी किमान 25% गुण अनिवार्य आहेत.
फिजिकल चाचणी:
लाइन अटेंडंट, सबस्टेशन अटेंडंट आणि सर्वेयर अटेंडंट पदांसाठी उमेदवारांना 15 किलो वजनासह 1 किमी अंतर 10 मिनिटांत चालून पूर्ण करावे लागेल. ही चाचणी फक्त एकदाच दिली जाईल.
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया:






