Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PAT Exam : पॅट परीक्षेत गोंधळ! सफाई कर्मचारी आणि पालकांवर पर्यवेक्षणाची जबाबदारी

पॅट (PAT) परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील महापालिका शाळांमध्ये मोठा गोंधळ उडाला. निवडणूक कामामुळे शिक्षकांची कमतरता भासल्याने पर्यवेक्षणासाठी सफाई कर्मचारी आणि पालकांची नियुक्ती करण्यात आली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 12, 2026 | 05:25 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पॅट (PAT) परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील महापालिका शाळांमध्ये गंभीर गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर निवडणूक कामासाठी नियुक्त केल्यामुळे परीक्षा केंद्रांवर शिक्षकांची कमतरता भासली. परिणामी, काही शाळांमध्ये पर्यवेक्षक म्हणून सफाई कर्मचारी आणि पालकांची नियुक्ती करण्याचा अजब प्रकार घडला.

खानवडीत ‘ज्योती-सावित्री’ शाळेचे उद्घाटन; महिलांच्या ३३% आरक्षण निर्णयाला फुले विचारांची जोड

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) दरवर्षी या परीक्षेचे आयोजन करते. यंदा ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी परीक्षा होणार असून, शनिवारी प्रथम भाषेचा पहिला पेपर पार पडला. मात्र, अनेक शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नसल्याने मुख्याध्यापकांसमोर परीक्षा सुरळीतपणे कशी पार पाडायची हा मोठा प्रश्न उभा राहिला. त्यातच काही ठिकाणी प्रश्नपत्रिकांची अपुरी उपलब्धता असल्याने परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली.

या पार्श्वभूमीवर, काही शाळांनी तात्पुरता उपाय म्हणून सफाई कामगारांना वर्गावर पर्यवेक्षक म्हणून पाठवले, तर काही ठिकाणी पालकांची मदत घेण्यात आली. मात्र, अशा पद्धतीमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पर्यवेक्षणाचा अनुभव नसल्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेमुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शाळा प्रशासनाने परीक्षा कालावधीत शिक्षकांना निवडणूक कामातून सूट देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून पुढील पेपर सुरळीत पार पडू शकतील. अन्यथा आगामी परीक्षांमध्येही अशाच गोंधळाची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.

MHT PCM CET परीक्षेला सुरूवात; महाराष्ट्रात तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची उपस्थिती

एकीकडे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी अशा परीक्षा घेतल्या जात असताना, दुसरीकडे व्यवस्थापनातील त्रुटींमुळे त्याच उद्देशावर पाणी फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. योग्य नियोजन आणि समन्वयाचा अभाव असल्यास शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.

Web Title: Responsibility for supervision rests with cleaning staff and parents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 05:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.