career (फोटो सौजन्य : social media)
आरआरबी एनटीपीसी पदवीधर पातळी सीबीटी १ ची परीक्षा ५ जून ते २४ जून २०२५च्या दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी नवीनतम अपडेटसाठी अधिकृत वेबसाईट तपासावी. तुम्ही निकाल कसे आणि कुठे बघू शकता? चला जाणून घेऊया.
त्वरीत करा GATE 2026 साठी अर्ज, नाहीतर भरावा लागेल दंड; कशी आहे प्रक्रिया
कटऑफ जाहीर करण्यात येईल
प्राथमिक माहितीनुसार, या परीक्षेच्या निकालासह श्रेणीनिहाय कटऑफ जाहीर करण्यात येईल. कटऑफच्या आधारे उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच सीबीटी २ परीक्षेसाठी पात्र मानले जाईल. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख आवश्यक असेल. ही परीक्षा उत्तीर्ण होणारेच सीबीटी २ साठी पात्र ठरतील.
कोणत्या पदांसाठी किती पदे
गुड्स ट्रेन मॅनेजर – ३१४४
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर – १७३६
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – १५०७
स्टेशन मास्टर – ९९४
वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक – ७३२
पदांची माहिती येथे आहे:
गुड्स ट्रेन मॅनेजर – ३१४४
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर – १७३६
कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक – १५०७
स्टेशन मास्टर – ९९४
वरिष्ठ लिपिक कम टंकलेखक – ७३२
एकूण ८,११३ पदांसाठी हि भरती घेण्यात आली आहे.ल ज्यासाठी एकूण ५,८४,०८६१ उमेदवारांनी नोंदणी केली होती. आता, हे लाखो उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत.
8,875 रिक्त पदांसाठी RRB ने दिली सुवर्णसंधी; ताबडतोब करा अर्ज
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) कडून मोठी संधी जाहीर झाली आहे. RRB ने 2025 पर्यंत एनटीपीसी (NTPC) भरतीसाठी एकूण 8,875 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये 5,817 पदं ग्रॅज्युएट पास उमेदवारांसाठी, तर 3,058 पदं अंडरग्रॅज्युएट (12वी पास) उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.
ग्रॅज्युएट पदांपैकी सर्वाधिक भरती मालगाडी प्रबंधक (Goods Guard) 3,423 पदं यासाठी आहे. त्याचबरोबर ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट-कम-टायपिस्ट (921 पदं) आणि स्टेशन मास्टर (615 पदं) यासाठी देखील जागा आहेत. याशिवाय सीनियर क्लर्क-कम-टायपिस्ट (638 पदं), चीफ कमर्शियल-कम-टिकट सुपरवायझर (161 पदं) आणि ट्रॅफिक असिस्टंट मेट्रो रेल्वे (59 पदं) यांचाही समावेश आहे.
अंडरग्रॅज्युएट (12वी पास) स्तरावर सर्वाधिक भरती कमर्शियल-कम-टिकट क्लर्क (2,424 पदं) साठी आहे. तसेच अकाउंट्स क्लर्क-कम-टायपिस्ट (394 पदं), ज्युनिअर क्लर्क-कम-टायपिस्ट (163 पदं) आणि ट्रेन क्लर्क (77 पदं) यासाठी देखील संधी आहे. या भरतीत SC, ST, OBC आणि EWS उमेदवारांना आरक्षण नियमांनुसार लाभ मिळणार आहे.