
Railway Recruitment
RRB Section Controller Exam 2026: रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) एक महत्त्वाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या सूचनेनुसार आरआरबीने सेक्शन कंट्रोलर पदांसाठी होणाऱ्या सीबीएटी (CBAT) परीक्षा २०२६ तारखेत बदल केला आहे. आरआरबीकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सेक्शन कंट्रोलर भरती २०२६ ही ६ जून २०२६ रोजी आयोजित केली जाईल. विशेष म्हणजे २४ मे २०२६ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या तारखेत बदल करून १३ मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या नोटीसनुसार नवीन तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
त्यामुळे आता उमेद्वार परीक्षेच्या तारखेच्या ४ दिवसांपूर्वी प्रवेशपत्र म्हणजेच ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात. रेल्वे बोर्डाकडून असा सल्ला देण्यात आला आहे की, परीक्षेसंदर्भातील अद्यायात माहितीसाठी वेळोवेळी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत रहावे, जेणेकरून परीक्षेसंबंधी कोणतीही महत्त्वाची सूचना त्वरित मिळेल.
आरआरबी भरती मंडळाने हे देखील स्पष्ट केले आहे की, पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरती परीक्षेच्या अधिसूचनेची सर्व अटी आणि नियम पहिल्यासारखे लागू राहतील. आरआरबी सेक्शन कंट्रोल भरती परीक्षा २०२६ मध्ये इतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तसेच रेल्वे बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या नोटीसमध्ये सर्व उमेद्वारांना खोटे एजंट आणि दलालापासून सावध आणि सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सेक्शन कंट्रोल भरती परीक्षा २०२६ मधील निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल, असेही सूचित करण्यात आले आहे.