Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आरटीई प्रवेश प्रक्रिया टप्पा २ सुरु; पालकांनी वेळेत कागदपत्र पडताळणी पूर्ण करण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा २ मधील ९५५ विद्यार्थ्यांसाठी ८ ते १५ एप्रिल २०२५ दरम्यान प्रवेश फेरी सुरू आहे. पात्र पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 10, 2025 | 07:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

शिक्षणाचा हक्क (RTE) अधिनियम २००९ अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक २ मध्ये समाविष्ट ९५५ विद्यार्थ्यांसाठी ८ एप्रिल २०२५ रोजी प्रवेश फेरी सुरु करण्यात आली असून, ती १५ एप्रिल २०२५ पर्यंत चालणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे शाळा अलॉटमेंटची माहिती दिली जात आहे. मात्र, अनेकवेळा तांत्रिक अडचणींमुळे एसएमएस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पालकांनी केवळ एसएमएसवर विसंबून न राहता, RTE पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश स्थिती तपासावी. तसेच वेळोवेळी पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? NPCIL ची बंपर भरती; ४०० रिक्त जागांना भरण्यात येणार

प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक अलॉटमेंट लेटर, आधार कार्ड, राहण्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशा आवश्यक कागदपत्रांसह १५ एप्रिल २०२५ पर्यंत जवळच्या पडताळणी केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. कागदपत्र पडताळणी झाल्यानंतरच विद्यार्थ्याचा प्रवेश अंतिम करण्यात येणार आहे. दिलेल्या वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास प्रवेश रद्द होण्याची शक्यता असल्यामुळे पालकांनी विशेष काळजी घ्यावी.

ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती व महानगरपालिका क्षेत्रांत एकूण ६२७ पात्र शाळा आहेत, ज्यामध्ये एकूण ११ हजार ३२० जागा मोफत शिक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यामध्ये आतापर्यंत एकूण ७ हजार ९४५ विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या प्रवेश देण्यात आला आहे. शिल्लक राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादी टप्पा २ अंतर्गत आणखी ९५५ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही अनेक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

दागिन्यांच्या क्षेत्रात घडवा करिअर, कमवा लाखों… ‘या’ विद्यापीठाने सुरू केला Jewellery Designing कोर्स!

शिक्षण विभागाकडून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, प्रभावी आणि न्याय्य पद्धतीने राबवण्यात येत आहे, जेणेकरून गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या शासकीय योजनेचा लाभ निश्चित मिळावा. त्यामुळे संबंधित पालकांनी वेळेचे भान ठेवून आवश्यक कागदपत्रांसह दाखल होऊन सर्व औपचारिकता पूर्ण कराव्यात. ही संधी गमावू नये यासाठी शिक्षण विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन करत तसेच विविध माध्यमांतून माहिती देत पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हा हक्क ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक पात्र विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, शिक्षणाच्या समान संधी सर्वांना मिळाव्यात, हाच या योजनामागचा प्रमुख उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Rte admission process phase 2 begins education department appeals to parents to complete document verification on time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 06:21 PM

Topics:  

  • right to education

संबंधित बातम्या

ZP Teacher Suspension :  शिक्षण क्षेत्रात खळबळ! तब्बल ३५ शिक्षकांचं एकाचवेळी निलंबन; नक्की काय आहे प्रकरण
1

ZP Teacher Suspension : शिक्षण क्षेत्रात खळबळ! तब्बल ३५ शिक्षकांचं एकाचवेळी निलंबन; नक्की काय आहे प्रकरण

राज्यातील शिक्षण व्यवस्थेचं भीषण वास्तव समोर; 8 हजार गावांमध्ये शाळाच नाहीत
2

राज्यातील शिक्षण व्यवस्थेचं भीषण वास्तव समोर; 8 हजार गावांमध्ये शाळाच नाहीत

मराठवाड्यात अजूनही ६२११ जागा रिक्त,चार महिन्यांची प्रक्रिया असूनही प्रतिसाद कमी
3

मराठवाड्यात अजूनही ६२११ जागा रिक्त,चार महिन्यांची प्रक्रिया असूनही प्रतिसाद कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.